शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाहांना समाजाने आधार द्यावा

By admin | Updated: May 7, 2014 22:18 IST

जातीअंताच्या लढाईसाठी आंतरजातीय विवाहांना समाजाने आधार द्यावा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केले.

पुणे : स्त्रिया आणि दलित हे समाजातील दोन्ही प्रवाह नेहमी दुर्लक्षित राहिले आहेत, त्यांचा आवाजही कायम दाबला गेलेला आहे. नितीन आगेचे खून प्रकरण त्या मानसिकतेतूनच घडले आहे. जातीअंताच्या लढाईसाठी आंतरजातीय विवाहांना समाजाने आधार द्यावा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केले.लोकायत, पुणे जिल्हा मोलकरीण संघटना, श्रमिक महिला मोर्चा, मासूम, युवक क्रांती दल, मिळून सार्‍याजणी, नारी समता मंचया समविचारी संघटनांच्यावतीने खर्डा येथील जातीय अत्याचारविरोधी घटनेच्या विरोधात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेधा थत्ते, सुनीती सु. र., अतुल पेठे, मारूती भापकर, अन्वर राजन, मुकुंद किर्दत, नीरज जैन, मकरंद साठे उपस्थित होते. पुन्हा पुन्हा अशा सभा घेण्याची वेळ येणे ही चांगली गोष्ट नाही. घटनेचे प्रत्यक्षदर्शी असणार्‍या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांनी साक्ष देण्यासाठी पुढे यावे असे विद्या बाळ यांनी स्पष्ट केले.मारूती भापकर म्हणाले, 'दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर लाखोंच्या संख्येने तरूण-तरूणींनी पुढे येऊन प्रशासनाला घाम फोडला होता. त्याप्रमाणे आताही जातीवादाच्या विरोधात तरूण-तरूणींनी मोठया संख्येने एकत्र यावे. आता खेडयांकडे जाऊन लोकांमध्ये फुले व आंबेडकरांचे विचार रूजविण्याची आवश्यकता आहे.'नितीन आगे याच्या खूनानंतर प्रस्थापित व्यवस्थेने बाळगलेलं मौन सर्वाधिक त्रासदायक आहे. जातीचे किल्ले पाडायला आता सर्वांनी सिध्द झाले पाहिजे असे सुनिती सु. र. यांनी सांगितले. अतुल पेठे म्हणाले, 'फँ ड्री जिथे संपते तिथे नितीन आगेचे प्रकरण पुढ सुरू होते. २०१४ च्या वर्षात घडलेल्या या घटनेमुळ शरमेने मान खाली जाते आहे. या घटनेने दलितांबरोबरच मुलींनाही एक इशारा दिला गेला आहे. स्वत:च्या मर्जीने कुठल्याही तरूणाच प्रेमात पडाल तर तुमची अवस्था अशी होईल असा गर्भित अर्थ यामध्ये सामावलेला आहे.'पुन्हा पुन्हा या घटना घडणार नाही याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे अन्वर राजन यांनी स्पष्ट केले. लेखक व साहित्यिकांनी या घटनेविरोधात रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता असल्याचे मकरंद साठे यांनी सांगितले.