शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॉमन सर्व्हिस सेंटर्स फेब्रुवारीपासून बंदच!

By admin | Updated: June 30, 2017 01:20 IST

‘डिजिटल इंडिया’अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू करण्यात आलेली कॉमन सर्व्हिस सेंटर्स गेल्या फेब्रुवारीपासून बंदच आहेत.

डॉ. खुशालचंद बाहेती। लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘डिजिटल इंडिया’अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू करण्यात आलेली कॉमन सर्व्हिस सेंटर्स गेल्या फेब्रुवारीपासून बंदच आहेत. पीपीपी म्हणजे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपमधून ही सेंटर्स सुरू करण्यात आलेली आहेत. डिजिटल इंडियाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतील १० हजार ४७३ व शहरी भागांतील १ हजार ३३६ सेंटर्स सुरू करण्यात आली; परंतु या सेंटर्सवर आधार कार्ड व निवडणूक ओळखपत्र वगळता अन्य सेवा फेब्रुवारीपासूनच बंद पडल्या आहेत. त्यामुळे गैरसोयी दूर होण्याऐवजी त्या वाढल्या आहेत. ही सेंटर्स बंद पडण्यामागे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात येत असल्याचे कारण सांगितले जात आहे. तब्बल पाच महिने उलटूनही ही सेंटर्स पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत नसतील, तर आता ‘डिजिटल इंडिया’ या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासकीय सेवा सुलभ रीतीने उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या कॉमन सर्व्हिस सेंटर्सची निर्मिती करण्यात आली. विशेषत: इंटरनेट व ई-बँकिंग सेवा ज्यांच्याकडे उपलब्ध नाहीत, त्यांना या सेंटर्सवर जाऊन या सेवा उपलब्ध करून घेण्याची सोय आहे. विजेचे बिल भरणे, परिवहन विभागातील वाहनांची नोंदणी करणे, चालक परवाना मिळवणे यासह शासनाच्या विविध विभागांतील परवाने मिळण्यासाठी अर्ज करणे, कागदपत्रे दाखल करणे, विविध कामांच्या निविदा भरणे ही कामे या सेंटर्सवरून व्हावीत, अशी संकल्पना आहे. याशिवाय शासकीय कार्यालयांमध्ये ज्या सुविधांसाठी रोख रक्कम स्वीकारण्यात येत नाही, त्यासाठी या सर्व्हिस सेंटर्सवर रोख रक्कम स्वीकारून ती सेंटर्सच्या खात्यातून शासनाकडे जमा करते. या बदल्यात कॉमन सर्व्हिस सेंटर प्रत्येक सेवेसाठी शासकीय रकमेव्यतिरिक्त२० रुपये आकारू शकते व तशी पावती द्यावी लागते. खरेतर यातून रोजगारही उपलब्ध व्हावा, असा हेतू आहे; पण सेंटर्सच बंद असल्याने रोजगार निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.