शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

दीक्षाभूमीच्या विकासासाठी कटिबद्ध - सुधीर मुनगंटीवार

By admin | Updated: October 20, 2016 00:50 IST

चंद्रपूरची दीक्षाभूमी हे भारतातील पवित्र स्थळ असून दीक्षाभूमीच्या विकासासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल, ..

चंद्रपूर: चंद्रपूरची दीक्षाभूमी हे भारतातील पवित्र स्थळ असून दीक्षाभूमीच्या विकासासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीद्वारे आयोजित ६० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाच्या मुख्य समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण घोटेकर होते. प्रमुख अतिथी अमेरिकेचे होझान अलन सेनाडके, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, आ. नाना शामकुळे आठवले, आ. नाना शामकुळे, प्रधान सचिव श्याम तागडे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान, जि.प. सीईओ देवेंद्र सिंग, धम्मचारी मैत्रेयनाथ, धम्मचारी वीरधम्म, संस्थेचे उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सचिव वामनराव मोडक, सहसचिव कुणाल घोटेकर, अ‍ॅड. राहुल घोटेकर, सखाराम पालतेवार, धर्मपाल घोटेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर आदी उपस्थित होते.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी डॉ. बाबासाहेबांची धम्मदीक्षा ही जगातील सर्वश्रेष्ठ मानव कल्याण करणारी क्रांती आहे, असे म्हटले. अध्यक्षीय भाषणात अरुण घोटेकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला. तो सहेतूक आहे. धम्माद्वारे स्वत:च्या संस्कृतीचा आपण शोध घेतला आहे. धर्मातराद्वारे भारतात सदाचरण रुजविण्याचा हा दिन आहे. त्यामुळे धम्माच्या क्षेत्रात फार मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. येणाऱ्या पिढ्यांच्या भल्यासाठी आपण ही धम्म चळवळ सर्वशक्तीनिशी संघटीतपणे पुढे नेण्याचा संकल्क करु. या लाखोंच्या संख्येने आपण आला आहात आपण सर्वांनी बुद्ध, बाबासाहेबांचे विचार घेतले जावे, असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमात प्रास्ताविक अशोक घोटेकर यांनी केले. संचालन प्रा.मनोज सोनटक्के व आभार वामनराव मोडक यांनी मानले. (प्रतिनिधी)