शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

स्मार्ट सिटीसाठी आयुक्त जाणार इस्त्रायलला स्थायी सभा: भुयारी रेल्वे पुलाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

सोलापूर : केंद्र सरकारने सोलापूरचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश केल्यानंतर प्रशिक्षणासाठी महापालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम?पाटील यांची इस्त्रायल दौर्‍यासाठी निवड केली आहे. या दौर्‍यासाठी येणार्‍या अडीच लाखांच्या खर्चास शुक्रवारच्या स्थायी सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.

सोलापूर : केंद्र सरकारने सोलापूरचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश केल्यानंतर प्रशिक्षणासाठी महापालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम?पाटील यांची इस्त्रायल दौर्‍यासाठी निवड केली आहे. या दौर्‍यासाठी येणार्‍या अडीच लाखांच्या खर्चास शुक्रवारच्या स्थायी सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.
स्थायी समितीची सभा सभापती पद्माकर काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत तातडीच्या विषयाला आयुक्तांच्या इस्त्रायल दौर्‍याच्या खर्चास मंजुरी देण्याचा विषय चर्चेला आला. स्मार्ट सिटी योजनेचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील ठाणे, नागपूर आणि सोलापूर महापालिका आयुक्तांची इस्त्रायल दौर्‍यासाठी केंद्र शासनाने निवड केली आहे. 4 नोव्हेंबर रोजी हा दौरा असणार आहे. आयुक्तांच्या अधिकार खर्चातून अभ्यास दौर्‍याच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.
त्याचबरोबर शमी क?य़ाचे सुशोभीकरण, मडकी वस्तीजवळ फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरूस्तीचा खर्च, उजनी जलवाहिनीवरील पाणीचोरी पकडताना केलेल्या वेल्डिंगचा खर्च, टाकळी जलवाहिनीवरील गळती दुरूस्तीचा खर्च, जेटिंग मशीनच्या दुरूस्ती खर्चाला एकमताने मान्यता देण्यात आली. जवाहर सोसायटी ते अंत्रोळीकरनगरापर्यंत स्ट्रॉमड्रेन लाईन घालणे, केशवनगर झोपडप?ीतील जुने शौचालय पाडून नवीन बांधणे व जागा भाड्याने देण्याचा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला. एलबीटी वसुली घटल्यावर तत्कालीन आयुक्त गुडेवार यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दोन वेतनवाढी रोखल्या होत्या. 23 अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वेतनवाढ स्थगितीचे आदेश रद्द करण्यास बहुमताने मंजुरी देण्यात आली.
इन्फो..
भुयारी पुलासाठी 37 लाख
अरविंद धाम पोलीस वसाहतीजवळ भुयारी रेल्वे पूल बांधण्यासाठी कन्सल्टन्सी नेमण्यासाठी 37 लाखांच्या खर्चास एकमताने मंजुरी देण्यात आली. जुना पुणे नाका ते मंगळवेढा रोड तेथून विजापूर रोडवर सोरेगावपर्यंत 58 फुटी रस्ता करण्याचे नियोजित आहे. भुयारी रेल्वे मार्गामुळे काम रखडले आहे. या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या खर्चास मंजुरी दिल्याने आता पूल उभारण्याच्या कामाला गती येणार आहे.