नवी दिल्ली : क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर याच्या राज्यसभेतील अनुपस्थितीबाबत राजकीय वतरुळात टीकेचा सूर उमटत आहे. या वर्षी संसदेत तो एकदाही उपस्थित न राहिल्याबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.
सचिन सभागृहात उपस्थितच राहत नसेल तर त्याच्या नियुक्तीला काय अर्थ आहे, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी उपस्थित केला आहे. त्याची 2क्12 मध्ये राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती व त्याने नियमित हजर राहण्याचे आश्वासन दिले होते, असेही ते म्हणाले.
मागील वर्षी त्याची केवळ 3 टक्के उपस्थिती होती. सपाचे
नरेश अगरवाल व राष्ट्रवादीचे
डी.पी. त्रिपाठी यांनीही टीकेची झोड उठवली आहे. अशा व्यक्तींची नियुक्तीच करायला नको. हा भारतीय संसदेचा अवमान आहे, असेही
त्यांनी सुनावले आहे. यापूर्वी गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याही बाबतीत असेच घडल्याने वाद निर्माण झाला होता.