शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आ. जाधव यांना तात्पुरता जामीन-

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

आ. जाधव यांना तात्पुरता अटकपूर्व जामीनपोलीस अधिकार्‍यास मारहाण प्रकरणनागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सुरक्षा बंदोबस्त सांभाळणारे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने आ. हर्षवर्धन जाधव यांना २९ डिसेंबरपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. मारहाणीची ही घटना ...


आ. जाधव यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन
पोलीस अधिकार्‍यास मारहाण प्रकरण
नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सुरक्षा बंदोबस्त सांभाळणारे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने आ. हर्षवर्धन जाधव यांना २९ डिसेंबरपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला.
मारहाणीची ही घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हॉटेल प्राईडमध्ये घडली होती.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे मंत्री आणि आमदारांची बैठक घेतल्यानंतर ते आपल्या कक्षात गेले होते. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ठाकरे यांच्या भेटीसाठी कुणाला आत सोडायचे, कुणाला नाही, याची जबाबदारी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर होती. कदम यांनी दार उघडून मंत्र्यांना आत घेतले होते. मात्र, जाधव यांना बाहेर थांबण्यास सांगून त्यांनी दार लावून घेतले होते. परिणामी आ. जाधव चिडले होते.
ठाकरे यांचा सुरक्षा बंदोबस्त सांभाळणारे विशेष सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनी आ. जाधव यांना शांत करण्याचा प्रयत्न करताच जाधव यांनी त्यांच्याच कानशिलात लगावली.
पराग जाधव यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी कालच आ. जाधव यांच्याविरुद्ध भादंविच्या ३२३, ३५३, ३३२ कलमान्वये गुन्हा दाखल केला.
अटक टाळण्यासाठी आ. जाधव यांनी आज न्यायालयात धाव घेऊन आपले वकील ॲड. आर. एस. अकबानी आणि ॲड. अतुल मोदी यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या अर्जातच त्यांनी तात्पुरत्या अटकपूर्व जामिनाची विनंती केली. ती न्यायालयाने मंजूर केली.
न्यायालयाने हर्षवर्धन जाधव यांच्या अर्जावर सरकारला नोटीस जारी करून २९ डिसेंबरपर्यंत उत्तर मागितले आहे. याच दिवशी अटकपूर्व जामीन कायम होण्यावर सुनावणी होणार आहे.