शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्व प्रकारच्या विदेशी गुंतवणुकीसाठी संयुक्त मर्यादा

By admin | Updated: July 17, 2015 04:23 IST

विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढविण्यासाठी सरकारने थेट विदेशी गुंतवणूक धोरण अधिक सुलभ केले असून सर्व प्रकारच्या विदेशी गुंतवणुकीला एकाच व्याप्तीत आणून विविध

नवी दिल्ली : विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढविण्यासाठी सरकारने थेट विदेशी गुंतवणूक धोरण अधिक सुलभ केले असून सर्व प्रकारच्या विदेशी गुंतवणुकीला एकाच व्याप्तीत आणून विविध उद्योगांसाठी विदेशी गुंतवणुकीची संयुक्त मर्यादा निश्चित करण्यास मंजुरी दिली आहे. याचा फायदा किरकोळ व्यवसाय क्षेत्रात कंपन्या, शेअर बाजार आणि अन्य क्षेत्राला गुंतवणुकीच्या स्वरूपात होऊ शकतो.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, आतापासून एफआयआय, एनआरआय आणि अन्य विदेशी गुंतवणुकीची श्रेणी एकच असेल. याला संयुक्त मर्यादा समजले जाईल. थेट विदेशी गुंतवणुकीचे धोरण सुलभ करणे, हा यामागचा उद्देश होता. जेणेकरून विदेशी गुंतवणूक अधिक प्रमाणात आकर्षित करून व्यवसाय अधिक सुलभ व्हावा. वाणिज्य आणि उद्योगमंत्रालयाच्या या प्रस्तावामुळे विदेशी गुंतवणुकीचे विविध श्रेणीबाबतच्या मर्यादेसंदर्भातील संदिग्धता दूर होईल.कृषी, चहा, खनन, प्रसारण, मीडिया, एअरपोर्ट, किरकोळ (एकेरी-बहुविध ब्रँड) ई-कॉमर्स, बँकिंग, विमा यासारख्या क्षेत्रांसाठी विदेशी गुंतवणुकीची संयुक्त मर्यादा निश्चित करण्याचा मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणानुसार एफडीआय, एफआयआय आणि एनआरआय सारख्या विविध श्रेणीतील गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या मर्यादा आहेत. विदेशी गुंतवणुकीच्या संयुक्त व्याप्तीत थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय), एफपीआय, एफआयआय आणि क्यूएफआय (विदेशी संस्थात्मक आणि पात्र विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार), एनआरआय (अनिवासी भारतीय) आणि एफवायसी (विदेशी उद्योग भांडवली गुंतवणूकदार) या श्रेणीतील गुंतवणुकीचा समावेश असेल.