शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणी समर्थक व विरोधक सत्तेसाठी एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 05:26 IST

देशात ४३ वर्षांपूर्वी आणीबाणी आणणारे आणि आणीबाणीला कडाडून विरोध करणारे सध्या सत्तेच्या लालसेसाठी एकत्र आले असून, विकासाला विरोध करून ते देशात अराजकता निर्माण करू पाहत आहेत

संत कबीर नगर (उत्तर प्रदेश) : देशात ४३ वर्षांपूर्वी आणीबाणी आणणारे आणि आणीबाणीला कडाडून विरोध करणारे सध्या सत्तेच्या लालसेसाठी एकत्र आले असून, विकासाला विरोध करून ते देशात अराजकता निर्माण करू पाहत आहेत, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले.मगहर गावी असलेल्या संत कबीराच्या मजहरला (समाधी) पंतप्रधानांनी कार्यक्रमाआधी चादर चढवली. त्यानंतरच्या सभेतील त्यांचे भाषण पूर्णपणे लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराप्रमाणे होते. काँग्रेसच्या आणीबाणीला विरोध करणारे अनेक राजकीय पक्ष तसेच त्या काळात तुरुंगात गेलेले विरोधी नेते हे सध्या भाजपाविरोधी आघाडीत एकत्र आले आहेत. त्याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, या सर्वांच्या एकत्र येण्याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे सत्तालोलुपता. सत्तेपोटी परस्परविरोधी विचारांची मंडळी कशी एकत्र येतात, हे सर्वांना पाहायला मिळत आहे.या सभेत पंतप्रधानांनी महात्मा फुले, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, या राष्ट्रपुरुषांनी समाजातील असमानता दूर करण्यासाठी प्रयत्न केले होते. डॉ. आंबेडकर यांनी तर सर्वांना समान अधिकार दिले, राज्यघटना दिली. पण या महापुरुषांच्या नावाने राजकारण करून समाजात दुही निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (वृत्तसंस्था)आम्ही शांतता,स्थैर्य देत आहोतकाही राजकीय पक्षांना देशात शांतता, विकास व स्थैर्य नको आहे. त्यांना हवी आहे केवळ अशांतता. देशात अशांतता व अस्थिरता असेल, तरच राजकीय फायदा उठवता येईल, असे या विरोधी पक्षांना वाटत आहे. पण या राजकीय पक्षांना व नेत्यांना देशातील जनतेचा स्वभाव माहीत नाही. जनतेला विकास, शांतता व स्थैर्य हवे आहे आणि आम्ही ते देत आहोत, असा दावा मोदींनी केला.