शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

ही तर केजरीवाल यांच्या हत्येची रंगीत तालीम

By admin | Updated: January 19, 2016 02:59 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर रविवारी झालेली शाईफेक ही त्यांच्या हत्येची रंगीत तालीम आहे आणि पुढच्या वेळी हे लोक शाईऐवजी बंदूक किंवा बॉम्ब घेऊन

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर रविवारी झालेली शाईफेक ही त्यांच्या हत्येची रंगीत तालीम आहे आणि पुढच्या वेळी हे लोक शाईऐवजी बंदूक किंवा बॉम्ब घेऊन येतील, असा आरोप आम आदमी पार्टीचे नेते आशुतोष यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला. दरम्यान, केजरीवाल यांच्यावर शाई फेकणारी तरुणी भावना अरोरा हिला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दुसरीकडे सुरक्षा व्यवस्थेतील कुचराईमुळे ही घटना घडल्याच्या आपच्या आरोपाचा दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी इन्कार केला.केजरीवाल यांच्या कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्थेतील कुचराईमुळेच शाईफेकीची घटना घडल्याचा आरोप आशुतोष यांनी केला. या घटनेबाबत जबाबदारी निश्चित करण्यात आली पाहिजे. रविवारची ही शाईफेक केजरीवाल यांच्या हत्येची रंगीत तालीमच आहे, असे दिसते. पक्षाने केजरीवालांना अतिरिक्त सुरक्षा पुरविण्यास कधीही सांगितलेले नाही; परंतु त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे, असे आशुतोष म्हणाले.दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी या शाईफेकप्रकरणी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली आणि सुरक्षा व्यवस्थेतील कुचराईमुळे ही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले. सुरक्षा व्यवस्थेतील कुचराईमुळे ही घटना घडल्याचा आपचा आरोप बिनबुडाचा आहे. केजरीवालांच्या सभास्थळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती, असे बस्सी यांनी सांगितल्याचे समजते. (वृत्तसंस्था)