शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाचा प्रारंभ गदारोळाने

By admin | Updated: July 21, 2015 22:45 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात मंगळवारी प्रचंड गदारोळात झाली. राज्यसभेत काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी ललित मोदीप्रकरणी परराष्ट्र व्यवहारमंत्री

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात मंगळवारी प्रचंड गदारोळात झाली. राज्यसभेत काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी ललित मोदीप्रकरणी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि व्यापमं घोटाळ्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली; परंतु सरकारने विरोधकांची मागणी फेटाळून लावल्याने दिवसभर कामकाज ठप्प राहिले.सरकारने स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळताना या मुद्यावर चर्चेची तयारी दर्शविली. पण आधी राजीनामा, मगच चर्चा या मागणीवर विरोधक अडून बसले. गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज चारदा तहकूब करावे लागले. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहरही गोंधळात वाहून गेला. कुणीही राजीनामा देणार नाही. आम्ही समर्पणाच्या भावनेतून देशासाठी काम करीत राहू, तुम्ही अडथळे आणत राहा. तुम्हाला चर्चा करायची असल्यास आमची तयारी आहे, असे संसदीय कामकाजमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी स्पष्ट केले. कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्यांनी आयपीएलचे फरार माजी आयुक्त ललित मोदी यांना स्वराज आणि राजेंनी केलेल्या मदतीचा मुद्दा उचलून धरला. पक्षाचे उपनेते आनंद शर्मा यांनी सरकारवर हल्लाबोल करताना मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्ती आदी आश्वासने दिली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. काँग्रेस सदस्यांच्या गोंधळातच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकार त्वरित या मुद्यावर चर्चेस तयार असल्याचे सांगितले. खुद्द सुषमा स्वराज या चर्चेला उत्तर देतील, अशीही ग्वाही त्यांनी दिली; परंतु काँग्रेसचे सदस्य सभापतींच्या आसनासमक्ष येऊन परराष्ट्रमंत्र्यांच्या बडतर्फीसाठी घोषणाबाजी करीत राहिले.समाजवादी पार्टी आणि माकपनेही काँग्रेसच्या मागणीला पाठिंबा दिला. परराष्ट्रमंत्री तसेच राजस्थान, मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावरील आरोपांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत तिघांनीही पदत्याग करावा, अशी मागणी माकप नेते सीताराम येचुरी यांनी केली. उपसभापतींनी चर्चा सुरू करण्यास सांगितले; परंतु विरोधक चर्चेच्या मन:स्थितीत नव्हते. माजी सदस्यांना श्रद्धांजलीपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत, राज्यसभेत दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)