सकाळी थंडी, दुपारी उन्हाचे चटके
By admin | Updated: February 5, 2016 00:34 IST
जळगाव- कमाल तापमानातील वाढ आणि १० ते १२ अंश सेल्सीअसपर्यंत स्थिर असलेले किमान तापमान यामुळे सकाळी थंडी आणि दुपारी चटके अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सकाळी थंडी, दुपारी उन्हाचे चटके
जळगाव- कमाल तापमानातील वाढ आणि १० ते १२ अंश सेल्सीअसपर्यंत स्थिर असलेले किमान तापमान यामुळे सकाळी थंडी आणि दुपारी चटके अशी स्थिती निर्माण झाली आहे. थंडीचे चारही महिने संपले आहेत. अर्थातच १७ फेब्रुवारीनंतर थंडीचे दिवस संपल्याचे अधिकृतपणे जाहीर केले जाईल. या शेवटच्या टप्प्यातही थंडीचा जोर बर्यापैकी आहे. मध्यरात्रीनंतर थंडीचा जोर वाढतो. तो अगदी पहाटेपर्यंत कायम असतो. दुपारी मात्र चटके२८ जानेवारीपर्यंत कमाल तापमान २८ अंश सेल्सीअसपर्यंत होते. नंतर मात्र त्यात वाढ होत गेली. कमाल तापमानात आता ३४ अंश सेल्सीअसपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे दुपारच्या वेळेस चटके बसतात. थंडी आणि दुपारचे चटके अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. कमाल तापमानातील वाढीमुळे तापाचे रुग्ण वाढले आहेत. वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम बालकांवर झाला आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील म्हणाले. कमाल तापमान घटलेमागील काळात कमाल तापमानात वाढ झालेली असली तरी गेल्या दोन दिवसात त्यात घट झाली आहे. ३ रोजी कमाल तापमान ३३ अंश सेल्सीअस होते. त्यात एकाच दिवसात एक अंश सेल्सीअसने घट झाली आहे. तापमानाची माहिती(तापमान अंश सेल्सीअसमध्ये)दिनांककमालकिमान१ फेब्रुवारी३४.६११.०२ फेबु्रवारी३४.०११.६३ फेब्रुवारी३३.४१०.६४ फेब्रुवारी३२.२१२.०