शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आयटी कंपनी कॉग्निजेंट करणार 6000 कर्मचा-यांची कपात

By admin | Updated: March 20, 2017 12:48 IST

कॉग्निजेंट या आयटी कंपनीत काम करणा-या कर्मचा-यांसाठी एक वाईट बातमी आहे.

ऑनलाइन लोकमतबंगळुरू, दि. 20 - कॉग्निजेंट या आयटी कंपनीत काम करणा-या कर्मचा-यांसाठी एक वाईट बातमी आहे. लवकरच ही कंपनी 6000 कर्मचा-यांना नोकरीवरून काढून टाकणार आहे. कॉग्निजेंट कंपनीत जवळपास 2.3 टक्के लोक काम करतात. कंपनीच्या व्यवसायात वाढ होत नसल्यानं कंपनीनं कर्मचा-यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर दरवर्षी कंपनी ज्यांचं काम चांगलं नाही, अशा 1 टक्के लोकांची कपात करते. मात्र यंदा कंपनीनं मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीसाठी यात काही नवं नाही. प्रत्येक कंपनी हे करतच असते. कॉग्निजेंट असं करणारी पहिली कंपनी नाही. ब-याचदा कंपन्यांचे अप्रायजल म्हणजेच मूल्यांकनाची प्रक्रिया कडक असल्यानं त्यांना चांगलं काम न करणा-या कर्मचा-यांना घरचा रस्ता दाखवावा लागतो, असंही कंपनीनं म्हटलं आहे. कॉग्निजेंट या कंपनीजवळ 2,65,000 कर्मचारी आहेत. कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, प्रत्येक वर्षी कंपनी काही कर्मचा-यांची कपात करते. त्यामुळेच कर्मचा-यांची संख्या काही प्रमाणात कमी होते. प्रत्येक वर्षी कंपनीकडून कर्मचा-यांच्या कामगिरीचं मूल्यमापन केले जाते. जेणेकरून कंपनीचं टार्गेट पूर्ण करू शकणा-या कर्मचा-यांना कंपनीत कार्यरत ठेवण्यात येतं. मात्र चांगली कामगिरी न करणा-या कर्मचा-यांना घरचा रस्ता दाखवण्यात येतो. त्यामुळे कर्मचा-यांना स्वतःमध्ये कंपनीला अनुसरून बदल करावा लागतो. असं केल्यानेच कर्मचा-यांना नोकरी टिकवणं सोपं होतं.