शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींकडे काणाडोळा

By admin | Updated: July 10, 2016 02:30 IST

कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी यापुढे वेतन आयोग स्थापन न करता कामगिरीवर आधारित मूल्यमापनप्रणाली अस्तित्वात आणावी, अशी महत्त्वपूर्ण आणि पुरोगामी शिफारस सातव्या वेतन

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी यापुढे वेतन आयोग स्थापन न करता कामगिरीवर आधारित मूल्यमापनप्रणाली अस्तित्वात आणावी, अशी महत्त्वपूर्ण आणि पुरोगामी शिफारस सातव्या वेतन आयोगाने केली होती; मात्र कर्मचारी संघटनांचा रोष पत्करावा लागू नये म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने या शिफारशीकडे काणाडोळा केला. आयोगाने वेतन रचनेचे सुसूत्रीकरण करण्याच्या उद्देशाने शिफारशींचा संच गेल्या आठवड्यात कार्मिक व प्रशिक्षण विभागाकडे सादर केला होता. तथापि, शिफारशींवरील पुढील प्रक्रियेसाठी यात कोणतीही कालमर्यादा ठरवून देण्यात आलेली नाही. वेतन आयोगाने सुचविलेल्या सुधारणांना कचऱ्याची टोपली दाखविण्यात आली असून, त्यामुळे वेतनाचे सुसूत्रीकरण आणि त्याची कामगिरीशी सांगड घालण्याची संधी आपण गमावली आहे, असे अर्थमंत्रालयातील एका वरिष्ठ सूत्राने सांगितले. आयोगाच्या या अहवालात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि खासगी क्षेत्रातील त्यांच्या समपदस्थांच्या वेतनातील प्रचंड फरकावर बोट ठेवले आहे. खासगी क्षेत्रातील वाहनचालकाला महिन्याला १२ हजार रुपये एवढे वेतन मिळते, तर सरकारी वाहनचालक नोकरीच्या अगदी प्रारंभीच्या काळात दरमहा २५ हजार रुपये मिळतात, असे आयोगाने नेमलेल्या अभ्यासगटाला आढळून आले. त्याचप्रमाणे एमबीबीएस पदवीधारक केंद्रीय सरकारी डॉक्टरला महिन्याकाठी ८० हजार ५०० रुपये एवढे वेतन मिळते, तर खासगी क्षेत्रातील डॉक्टरला मोठ्या मुश्किलीने ५० हजार रुपये मिळतात; मात्र एमडी किंवा एमएस पदवीधारक, तसेच १५ वर्षांचा अनुभव असलेल्या खासगी क्षेत्रातील डॉक्टरांना ३ लाख ७० हजार रुपये दरमहा वेतन मिळते, तर तेवढेच शिक्षण व अनुभव असलेल्या सरकारी डॉक्टरांना दरमहा १ लाख ६० हजार रुपये मिळतात, असेही या अभ्यासात दिसून आले. सनदी अधिकारी आणि इतर सेवांतील अधिकाऱ्यांत वेतन व पदोन्नतीबाबत साम्य निर्माण करण्याच्या शिफारशीचा समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)