शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विप्रोनं 600 कर्मचा-यांना दिला नारळ

By admin | Updated: April 20, 2017 21:30 IST

देशातील तिसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या विप्रोनं कर्मचा-यांना जबरदस्त धक्का दिला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 20 - देशातील तिसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या विप्रोनं कर्मचा-यांना जबरदस्त धक्का दिला आहे. विप्रोनं कर्मचा-यांच्या वर्षभरातल्या कामाच्या मूल्यमापनाच्या नावाखाली 600 कर्मचा-यांना नोकरीवरून बडतर्फ केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीच्या 600 कर्मचा-यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मात्र हा आकडा 2000 पर्यंतही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. डिसेंबर 2016ला कंपनीकडे 1.79 लाख कर्मचारी संख्या होती. ज्यावेळी कंपनीशी संपर्क साधण्यात आला, त्यावेळी कामगिरीच्या आधारावर मूल्यामापनाची प्रक्रिया खूप कठीण आहे, असं सांगण्यात आलं. दरवर्षी ही संख्या खाली किंवा वर होऊ शकते. मात्र कंपनीनं काढण्यात आलेल्या कर्मचा-यांसंदर्भात कोणतीही टिपण्णी केली नाही. विप्रोनं सांगितलं की, कर्मचा-यांच्या वार्षिक मूल्यमापन प्रक्रियेत मेंटरिंग, री- ट्रेनिंग सारख्या गोष्टी सामील आहेत. कंपनीच्या चौथ्या तिमाहीत अहवाल आणि पूर्ण वर्षाचा आकडा 25 एप्रिलला जाहीर केला जाणार आहे. आधीच अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये कामगार व्हिसासंदर्भात आयटी कंपन्यांत वातावरण दूषित झालं आहे. कंपन्या ब-याचदा कर्मचा-यांना क्लायंटच्या साइटवर पाठवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील कार्य व्हिसा वापरतात. या देशांमध्ये व्हिसा नियम कडक झाल्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये आव्हानाची परिस्थिती उद्भवली आहे. भारतीय आयटी कंपन्यांना 60 टक्के महसूल हा उत्तर अमेरिकेतल्या बाजारांतून प्राप्त होतो. तसेच 20 टक्के नफा हा यूरोप आणि इतर देशांमधून मिळवला जातो. त्यामुळे एकंदरीत आयटी कंपन्यांवर अनिश्चिततेचे वादळ घोंगावताना दिसत आहे.