कोळसा माफिया हत्या प्रकरण
By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST
पिस्तूल लपवणाऱ्या डागोरचाजामीन अर्ज फेटाळलाकोळसा माफिया हत्या प्रकरण नागपूर : घुग्गुस येथील कोळसा माफिया सागीर अहमद सिद्दिकी याच्या खुनासाठी वापरलेले पिस्तूल लपविणाऱ्या एका आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. पप्पू ऊर्फ टिष्ट्वंकल ताजू डागोर (२१) रा. तेलंगखेडी, असे या आरोपीचे नाव आहे. २ ...
कोळसा माफिया हत्या प्रकरण
पिस्तूल लपवणाऱ्या डागोरचाजामीन अर्ज फेटाळलाकोळसा माफिया हत्या प्रकरण नागपूर : घुग्गुस येथील कोळसा माफिया सागीर अहमद सिद्दिकी याच्या खुनासाठी वापरलेले पिस्तूल लपविणाऱ्या एका आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. पप्पू ऊर्फ टिष्ट्वंकल ताजू डागोर (२१) रा. तेलंगखेडी, असे या आरोपीचे नाव आहे. २ डिसेंबर रोजी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास धरमपेठ येथील गोकुल वृंदावन हॉटेलच्या गल्लीत ऑडी कारमध्ये सागीरचा पिस्तुलातून गोळी झाडून खून करण्यात आला होता. कारमध्ये बसलेल्या शक्ती संजय मनपियाने मागून गोळी झाडली होती. त्यानंतर त्याने मॅग्झिनसह पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे पप्पू डागोर याला वोक्हार्ट इस्पितळ येथे देऊन लपविण्यास सांगितले होते. डागोर याने पिस्तूल व काडतुसे आपल्या घराच्या बाजूला असलेल्या पाईपमधून काढून दिले होते. त्याने गुन्ह्यास आणि गुन्ह्यातील आरोपींना पुरावा नष्ट करण्यास सहकार्य केल्याने त्याच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी भादंविच्या २०१ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. या आरोपीने जामीन मिळावा यासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील नितीन देशमुख यांनी काम पाहिले.