शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालच्या जनतेला कोरोना लस मोफत मिळणार; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा

By देवेश फडके | Updated: January 10, 2021 12:44 IST

पश्चिम बंगालच्या जनतेला कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ती महत्त्वाची मानली जात आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या नागरिकांना कोरोना लस मोफत देण्याची घोषणाकोरोना लसीकरणाबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मोठा निर्णय आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घोषणेला महत्त्व

कोलकाता :पश्चिम बंगालच्या जनतेला कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (रविवारी) केली. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आल्यानंतर आता १६ जानेवारी २०२१ पासून संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे. 

आगामी कालावधीत पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी केलेली घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. पश्चिम बंगालमधील जनतेला कोरोनाची लस मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. आगामी आठवड्यातील गुरुवारपासून पश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे. १४ जानेवारी २०२१ पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

ही घोषणा करताना मला आनंद होत आहे की, पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य सरकार व्यवस्था करत आहे. कोरोना लसीसाठी पश्चिम बंगालच्या जनतेला कोणताही खर्च येणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे. आगामी एप्रिल-मे या कालावधीत २९४ सदस्य असलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९ हजार ९२२ वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासांत नव्या ९७८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ५ लाख ५९ हजार ८८६ झाली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७९ टक्क्यांवर गेले आहे. तसेच आतापर्यंत ५ लाख ४१ हजार ९३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.  देशात कोरोना लसीकरणाची १६ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. सगळ्यात आधी आरोग्य कर्मचारीवर्गाला कोरोनाची लस दिली जाईल. त्यानंतर ५० पेक्षा जास्त वयोगटातील लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेचे आतापर्यंत विविध स्तरातील ६ लाखांहून अधिक लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीcorona virusकोरोना वायरस बातम्या