शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

केळीचा शालेय पोषण आहारात समावेश मुख्यमंत्र्यांची घोषणा : शाश्वत सिंचनासाठी जैन इरिगेशनने आराखडा तयार करावा

By admin | Updated: January 9, 2016 23:23 IST

(मुख्य १ व सेंट्रल डेस्कसाठी)

(मुख्य १ व सेंट्रल डेस्कसाठी)
फोटो- १०अप्पासाहेब पवार पुरस्कार- कॅप्शन: विजय व जयश्री इंगळे दाम्पत्यास पुरस्कार देताना देवेंद्र फडणवीस. सोबत डावीकडून रक्षा खडसे, ना.धों.महानोर, शरद पवार, भवरलाल जैन, हरिभाऊ जावळे, गिरीश महाजन.

जळगाव : केळीचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा निर्णय झाला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन हिल्स येथे शनिवारी दुपारी आयोजित पद्मश्री डॉ.अप्पासाहेब पवार आधुनिक कृषि उच्च-तंत्र पुरस्कार वितरण सोहळ्यात केली. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषि मंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार होते. शाश्वत सिंचनासाठी जैन इरिगेशनने राज्याचा आराखडा तयार करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
त्यांच्या हस्ते चितलवाडी, ता.तेल्हारा, जि.अकोला येथील विजय आत्माराम इंगळे पाटील यांना या पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन, पुरस्कार प्राप्त विजय इंगळे पाटील व त्यांच्या पत्नी जयश्री, खासदार रक्षा खडसे, कविवर्य ना.धों. महानोर आदी मान्यवर उपस्थित होते.
युती शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळेच यंदा शाश्वत सिंचन देता आल्याचे सांगत कृषितंत्रात बदल करणार नाही, तोपर्यंत परिवर्तन करता येणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
---- इन्फो---
शेतकर्‍यांनी रोखल्यावर घोषणा
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केळीचा उल्लेख न केल्याने उपस्थित शेतकर्‍यांमध्ये चुळबुळ सुरू होती. मुख्यमंत्री भाषण संपवून आपल्या आसनाकडे जात असतानाच उपस्थित शेतकर्‍यांनी केळीच्या विषयाचे काय? असा सवाल करीत गोंधळ केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परत माईकचा ताबा घेत अंगणवाडीच्या पोषण आहारात केळीच्या समावेशाचा निर्णय झाला असल्याची घोषणा केली.
---- इन्फो---
शाश्वत सिंचनासाठी आराखड्याची जबाबदारी
मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितले की, अनिल व अजित जैन यांच्याशी बोललो. शाश्वत सिंचनासाठी पूर्ण महाराष्ट्रासाठी जैन इरिगेशनने बृहतआराखडा तयार करावा, असे त्यांना सुचविले असल्याचे सांगितले. जैन इरिगेशनने अनेक प्रयोग केले आहेत. दक्षिणेतून आंबा आणून प्रक्रिया केली जात असल्याचे पाहून आ›र्य वाटले. कोकणातील आंब्यावर प्रक्रिया करावी, असे आवाहन त्यांना केले. त्यावर कोकणातही जागा घेतली असून तेथे हापूसवर प्रक्रिया प्रकल्प सुरू करणार असल्याचे समजल्याने समाधान वाटल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.