शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कपड्यांचा जॉबवर्क; जीएसटी दरात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:02 IST

ट्रॅक्टरच्या काही सुट्या भागांवरील जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे, तसेच कपड्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या जॉब वर्कवरील जीएसटी दरही १८ टक्क्यांवरून

नवी दिल्ली : ट्रॅक्टरच्या काही सुट्या भागांवरील जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे, तसेच कपड्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या जॉब वर्कवरील जीएसटी दरही १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. सर्व राज्यांचे वित्तमंत्री जीएसटी परिषदेचे सदस्य आहेत. आजच्या बैठकीत ई-वे बिलालाही अंतिम स्वरूप देण्यात आले. ई-वे बिलानुसार, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालाची विक्रीच्या उद्देशाने १० किमीपेक्षा जास्त अंतरावर वाहतूक करायची असल्यास त्याची नोंदणी करणे बंधनकारक असेल.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जेटली यांनी सांगितले की, ई-वे बिल लवकरच अधिसूचित केले जाईल. जीएसटीमधून सूट असलेल्या वस्तूंना मात्र ई-वे बिलाचा नियम लागू होणार नाही. जीएसटीअंतर्गत वर्क कॉन्ट्रक्टस्वर १२ टक्के कर लागेल. तसेच त्यावर इनपुट टॅक्स क्रेडिटही मिळेल.जेटली यांनी सांगितले की, ७१ लाख केंद्रीय आणि राज्य पातळीवरील करदाते जीएसटीमध्ये स्थलांतरित झाले आहेत. या करदात्यांनी जीएसटी नोंदणी पूर्ण केली आहे. आणखी १५.६७ लाख नवे नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहेत.जीएसटीमुळे कमी झालेल्या कराचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन जेटली यांनी यावेळी केले. तसे न करणाºया व्यावसायिक आणि उत्पादकांविरुद्ध नफेखोरीविरोधी नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा जेटली यांनी याप्रसंगी दिला. जीएसटी परिषदेची पुढील बैठक ९ सप्टेंबर रोजी हैदराबादेत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.