शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांच्या वैद्यकीय खर्चाची माहिती मिळण्याचे दरवाजे बंद

By admin | Updated: July 3, 2015 04:09 IST

न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबियांवर वैद्यकीय उपचारांसाठी होणाऱ्या खर्चाची माहिती उघड करणे हा त्यांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप असल्याने अशी माहिती आरटीआय

नवी दिल्ली : न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबियांवर वैद्यकीय उपचारांसाठी होणाऱ्या खर्चाची माहिती उघड करणे हा त्यांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप असल्याने अशी माहिती आरटीआय अर्थात माहिती अधिकार कायद्यान्वये उपलब्ध करून दिली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.‘आरटीआय’ कार्यकर्ते सुभाष अगरवाल यांनी केलेली विशेष अनुमती याचिका फेटाळताना सरन्यायाधीश एच. एल. दत्तू, न्या. अरुण मिश्रा व न्या. अमिताव राय यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. विशेष म्हणजे न्यायालयाने हा निकाल देऊन प्रशासकीय पातळीवर आपल्याच माहिती अधिकाऱ्याने घेतलेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे.माहिती उघड करण्याची अगरवाल यांची मागणी अमान्य करताना सरन्यायाधीश म्हणाले : आम्हाला आमच्या वैद्यकीय खर्चाचा परतावा जनतेच्या पैशातून मिळतो याची आम्हाला जाणीव आहे; पण न्यायाधीश म्हणून आम्ही सेवाशर्तींनुसार अशी प्रतिपूर्ती मिळण्यास पात्रही आहोत.अशी माहिती देणे हे न्यायाधीशांच्या खासगी जीवनात डोकावल्यासारखे होईल व इतरांप्रमाणे न्यायाधीशांच्या ‘प्रायव्हसी’चाही मान राखला जायला हवा, असे सांगताना न्यायालयाने म्हटले की, याला काही अंतच राहणार नाही. आज वैद्यकीय खर्चाची माहिती दिली की, उद्या तुम्ही त्यांनी कोणते औषधोपचार घेतले त्याची माहिती मागाल. त्यातून तुम्हाला न्यायाधीशांना कोणत्या व्याधी आहेत हे कळेल. असे करणे हा ‘प्रायव्हसी’चा भंग आहे. अर्जदार अगरवाल यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी असा युक्तिवाद केला की, न्यायाधीश हेही लोकसेवक (पब्लिक सर्व्हंट) आहेत. इतर लोकसेवक जनतेचा पैसा कसा खर्च करतात हे लोक माहिती अधिकाराखाली जाणून घेऊ शकतात. न्यायाधीशांचा नकाराचा रोख दिसल्यावर अ‍ॅड. भूषण म्हणाले की, राजकारणी आणि सनदी सेवांचा कारभार पारदर्शी व्हावा यासाठी न्यायालय वेळोवेळी आदेश देत असते; पण स्वत:च्या कारभाराच्या पारदर्शकतेचा विषय आला की मात्र न्यायसंस्था हात आखडता घेते, असा चुकीचा संदेश याने लोकांमध्ये जाईल.(लोकमत न्यूज नेटवर्क)काय होते हे प्रकरणसर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी केलेल्या खर्चाची तीन वर्षांची न्यायाधीशनिहाय माहिती मिळविण्यासाठी अगरवाल यांनी ‘आरटीआय’खाली अर्ज केला.अशी न्यायाधीशनिहाय माहिती ठेवली जात नाही, असे म्हणून न्यायालयाच्या माहिती अधिकाऱ्याचा माहिती देण्यास नकार. त्याविरुद्ध अगरवाल यांचा केंद्रीय माहिती आयोगाकडे अर्ज. अगरवाल यांना हवी असलेली माहिती त्यांना देण्याचा माहिती आयोगाचा आदेश. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालय प्रशासनाची दिल्ली उच्च न्यायालयात धाव. एकल न्यायाधीशाकडून माहिती आयोगाचा आदेश रद्द, याविरुद्ध अगरवाल यांनी केलेले अपील उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठानेही फेटाळले. याविरुद्ध अगरवाल यांची अनुमती याचिका आता न्यायालयाने फेटाळली.