शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

सरकारी बँका, उपक्रमांमध्ये ‘कॅम्पस’ भरती बंद करणार

By admin | Updated: April 16, 2017 00:54 IST

मुंबईच्या कामगारवस्तीत राहणाऱ्या चार तरुण-तरुणींनी केलेल्या याचिकेवर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांची बूज राखून केंद्र सरकारने सरकारी

नवी दिल्ली: मुंबईच्या कामगारवस्तीत राहणाऱ्या चार तरुण-तरुणींनी केलेल्या याचिकेवर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांची बूज राखून केंद्र सरकारने सरकारी बँका आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये गेली १० वर्षे रुढ झालेली ‘कॅम्पस भरती’ बंद करण्याचे ठरविले आहे.खासगी उद्योग आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अशा प्रकारे ‘कॅम्पस भरती’ सर्रास होत असते व चांगल्यात चांगले विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडताच त्यांना लठ्ठ पगार देण्याची त्यांच्यात जणू स्पर्धा सुरू असते. अशा प्रकारे कर्मचारी नेमणे घटनाबाह्य आहे व तसा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही ती सुरू ठेवणे बेकायदा आहे, असा सल्ला विधी मंत्रालयाने दिल्यानंतर ही पद्धत बंद करण्याचे ठरविले असल्याचे समजते.ज्या निकालाच्या दाखल्याने ही पद्धत बंद करण्याचा सल्ला दिला ते प्रकरण सोनाली प्रमोद धावडे (भायखळा), विशाल निकम (ना. मे. जोशी मार्ग), शिल्पा सीताराम जड्यार (लालबाग) आणि कविता गणपत टक्के (करी रोड) या मुंबईच्या चार तरुण-तरुणींनी दाखल केले होते. या चौघांचे प्रकरण फक्त सेंट्रल बँक आॅफ इंडियामध्ये केल्या जाणाऱ्या ‘कॅम्पस भरती’ संबंधी होते. परंतु त्यातील निकालात ठरविलेले सूत्र राज्यघटनेशी संबंधित असल्याने निकाल सर्वच सरकारी बँका आणि सार्वजनिक उपक्रमांना लागू करण्याचे सरकारने ठरविल्याचे दिसते.या चौघांनी केलेली रिट याचिका मंजूर करून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. अजय खानविलकर व न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने सेंट्रल बँकेस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्त्या ‘कॅम्पस भरती’ने करणे बंद करण्याचा आदेश १ एप्रिल २०१३ रोजी दिला. याविरुद्ध बँकेने केलेले अपीलही सर्वोच्च न्यायालयाने १९ आॅगस्ट २0१३ रोजी फेटाळले. सन २०१५ मध्ये मद्रास उच्च न्यायालयातही असेच प्रकरण दाखल झाले होते. सुरुवातीस त्या न्यायालयाने अशा भरतीस मनाई करणारा अंतरिम आदेश दिला होता. परंतु नंतरही मनाई उठविली गेली होती. मात्र मद्रास न्यायालयाने मुंबईच्या प्रकरणातील निकाल लक्षात घेतला नव्हता.खासगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर ‘कॅम्पस भरती’चा प्रकार सरकारी बँका आणि सार्वजनिक उपक्रमांमध्येही सुरू झाला होता. स्पर्धेत खासगी उद्योगांच्या समोर टिकाव लागावा यासाठी सरकारी बँका व सरकारी उद्योगांनाही देशातील सर्वोत्तम तंत्रशिक्षण व व्यवस्थापन शिक्षण संस्थांमधून उत्तीर्ण होऊन बाहर पडणारे हुशार व बुद्धिमान विद्यार्थी थेट नोकरीत घेण्याची मुभा मिळावी, अशी सबब यासाठी देण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)समानता, समान संधीचा भंग- भारतीय राज्यघटनेने नागरिकांना समानता आणि समान संधीचा मुलभूत अधिकार दिलेला आहे. त्यामुळे सरकारी नोकऱ्यांसाठी सर्व पात्र इच्छुकांना समान संधी देणे सरकारवर बंधनकारक आहे. - रीतसर जाहिरात देऊन अर्ज मागविणे व लेखी परीक्षा आणि मुलाखती घेऊन निवड करणे हा त्याचाच भाग आहे. ‘कॅम्पस भरती’ने राज्यघटनेचा हा दंडक पाळला जात नाही.