चोपडाई बाव जलतीर्थाची स्वच्छता
By admin | Updated: May 10, 2014 19:41 IST
जोतिबा : श्री केदारलिंग देवस्थान समितीच्या कर्मचार्यांनी श्रमदानातून श्री जोतिबा मंदिर परिसरातील चोपडाई बाव जलतीर्थातील गाळ काढून परिसर स्वच्छ केला.
चोपडाई बाव जलतीर्थाची स्वच्छता
जोतिबा : श्री केदारलिंग देवस्थान समितीच्या कर्मचार्यांनी श्रमदानातून श्री जोतिबा मंदिर परिसरातील चोपडाई बाव जलतीर्थातील गाळ काढून परिसर स्वच्छ केला.श्री जोतिबा मंदिर परिसरात पुरातन असे चोपडाईदेवी बाव जलतीर्थ आहे. या जलतीर्थामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला होता. पाण्यावर हिरवळ साठली होती. या जलतीर्थासाठी पाणी स्वच्छ राहावे यासाठी केदारलिंग देवस्थान समितीच्या कर्मचार्यांनी केदारलिंग देवस्थान समितीचे व्यवस्थापक दीपक म्हेत्तर यांच्या मार्गदर्शनाखाली जलतीर्थामध्ये उतरून गाळ काढण्यास प्रारंभ केला. देवस्थानचे कर्मचारी श्रमदान करीत असताना त्यांना स्थानिक तरुण मंडळानींही सहकार्य करीत गाळ काढण्यास मदत केली. या श्रमदानामध्ये दीपक म्हेत्तर, संतोष कचरे, ईलाई पठाण, लक्ष्मण डबाणे, अजित दादर्णे, शिवाजी जाधव, मदाळे, रवळनाथ गुरव, सोमनाथ नवाळे, शिवाजी कचरे, जोतिबा सोशल फौंडेशचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. वार्ताहर