शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नीरेचे नदीपात्र होणार स्वच्छ

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

जीवनवाहिनीसाठी सरसावले ग्रामस्थ : विविध संस्थांचाही सहभाग

जीवनवाहिनीसाठी सरसावले ग्रामस्थ : विविध संस्थांचाही सहभाग
नीरा : वाढलेली झाडेझुडपे, प्लॅस्टिकचा कचरा, निर्माल्य, गवत आणि गाळ यांमुळे नीरा नदीचे पात्र दूषित झाले होते. यामुळे ग्रमास्थांना दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. या परिसरासाठी जीवनवाहिनी असणार्‍या या नदीच्या स्वच्छतेसाठी ग्रामस्थांनी आणि सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी सुरुवात केली आहे.
पुणे आणि सातारा या जिल्‘ांच्या सीमेवरील पुरंदर तालुक्यातील नीरा शहराची जीवनवाहिनी असलेल्या नीरा नदीपात्राच्या स्वच्छता अभियानाला नीरा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अनिल चव्हाण यांच्या पुढाकाराने श्रीमंतयोगी ढोलताशा पथक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तरुणांनी विविध संस्था, उद्योजक आणि सामाजिक संघटना यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आले. नीरा नदीपात्राच्या स्वच्छता अभियानाला नुकताच मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
नीरा नदीपात्राच्या स्वच्छता अभियानाच्या शुभारंभ ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट संजय सपाटे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव, जलसंपदा विभागाचे उपअभियंता विजय नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव चव्हाण, दत्ताजीराव चव्हाण, सरपंच दिव्या पवार, डॉ. लीलाधर मंदकनल्ली, किरण जेधे, शैलेश रासकर, ॲड. आदेश गिरमे, रमेश जेधे, सतीश फरांदे, राजेश चव्हाण, उत्तमराव घुले यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे, सातारा, सोलापूर या जिल्‘ांसह नीरा शहराला वरदान ठरलेल्या नीरा नदीचे पात्र सध्या अस्वच्छ झाले होते. तीव्र दुष्काळी स्थितीतदेखील नीरा शहराला पिण्याच्या पाण्यासाठी जीवनवाहिनी ठरलेल्या नीरा नदीपात्रात काही वर्षांपासून झाडेझुडपे, पाणकंजाळ वाढलेले असून मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. त्याचप्रमाणे, नदीपात्रात प्लॅस्टिक कचरा आणि निर्माल्य साचले आहे. या अभियानात नदीपात्रातील ही सर्व घाण जेसीबी यंत्राच्या सा‘ाने स्वच्छ करण्यात येणार आहे.
या कामासाठी ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनी, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, नीरा पोलीस दूरक्षेत्र, सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळ यांच्यासह विविध संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी जेसीबी यंत्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. नीरा आणि लोणंद (जि. सातारा) शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार्‍या नीरेतील रेल्वे पुलापासून बंधार्‍यापर्यंतच्या भागातील नीरा नदीपात्रातील स्वच्छता आगामी ५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येईल.
दरम्यान, नदीपात्रातील घाणीच्या साम्राज्यामुळे पात्रातून पाणी वाहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नदीपात्रातून पाणी वाहत नसल्याने पाण्यावर कचरा साचून ते दूषित बनले असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
फोटो ओळी : नीरा शहराची जीवनवाहिनी असलेल्या नीरा नदीपात्रातील स्वच्छता अभियान शुभारंभाप्रसंगी उपस्थित विविध पदाधिकारी व ग्रामस्थ. (छाया : राहुल शिंदे, नीरा)