शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत योजनेला हादरा

By admin | Updated: June 22, 2017 02:06 IST

‘स्वच्छ भारत’ योजना कमालीची यशस्वी ठरत असल्याचा दावा करणाऱ्या सरकारला मात्र हा दावा खरा असल्याचे सिद्ध करता न आल्याने जागतिक बँकेला हात

नितीन अग्रवाल । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ योजना कमालीची यशस्वी ठरत असल्याचा दावा करणाऱ्या सरकारला मात्र हा दावा खरा असल्याचे सिद्ध करता न आल्याने जागतिक बँकेला हात आखडता घ्यावा लागला. परिणामी, या योजनेला जबर हादरा बसला आहे. 4 कोटी 17लाख शौचालये उभारल्याचा दावा करणाऱ्या सरकारला या दाव्यात तथ्यांश असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणताच मार्ग हाती नाही. त्यामुळे राज्यांतील विविध प्रकल्पांसाठी आर्थिक मदत देण्यास जागतिक बँकेने असमर्थता दाखविली आहे.ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, स्वच्छ भारत योजनेसाठी (ग्रामीण) जागतिक बँकेशी १५०० दशलक्ष डॉलरचा करार केला होता. पहिला हप्ता गेल्या वर्षी जुलैमध्ये मिळणार होता. दुसरा हप्ता या वर्षी जुलैत मिळणार होता. तथापि, बँकेने मागच्या वर्षी रक्कम जारी केली नाही. या वर्षीही अशीच शक्यता दिसते. सूत्रांनुसार देशभरात शौचालये उभारण्याचे काम गतीने केले जात आहे; परंतु या प्रकल्पातहत बांधण्यात आलेल्या शौचालयाबाबत खातरजमा न झाल्याने जागतिक बँकेने रक्कम जारी केली नाही.ग्रामीण विकासमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दावा केला की, या योजनेसाठी सरकारने पुरेशी आर्थिक व्यवस्था केली. जागतिक बँकेने रक्कम न जारी केल्याने या योजनेवर परिणाम होणार नाही. तांत्रिक समस्या आहे ती या आंतरराष्ट्रीय संस्थेची. भारताकडून समस्या नाही.स्वच्छता आणि पेयजल मंत्रालयाच्या दाव्यानुसार ४.१७ कोटी शौचालये उभारली गेली होती. एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ६४.१८ टक्के आहे. जवळपास २.०४ हजार गावे हागणदारीमुक्त घोषित करण्यात आली आहेत. याशिवाय ४ राज्ये आणि १४३ जिल्हे हागणदारीमुक्त मानली गेली आहेत. महाराष्ट्रात ८०.४९ टक्के शौचालये उभारण्यात आली.प्रोत्साहन म्हणून दिली रक्कम जागतिक बँकेच्या सूत्रांनुसार , १५०० दशलक्ष डॉलरपैकी १,४७५ दशलक्ष डॉलर राज्यांना प्रोत्साहन म्हणून दिले जाणार होते. उर्वरित २५ दशलक्ष डॉलरची रक्कम स्वच्छता आणि पेयजल मंत्रालयाला दिली जाणार होती.जागतिक बँक असमाधानी...मागच्या वर्षी स्वच्छ भारत योजनेची प्रगती समाधानकारक म्हणणारी जागतिक बँक आता मात्र असमाधानी आहे.