गुरू-शिष्य परंपरेतूनच शास्त्रीय गायक घडतात (भाग २)
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
नागपुरात सादरीकरण करण्याचा आनंद
गुरू-शिष्य परंपरेतूनच शास्त्रीय गायक घडतात (भाग २)
नागपुरात सादरीकरण करण्याचा आनंद डॉ. वसंतराव देशपांडे नागपूरचे होते. राहुल त्यांचा नातू आहे. त्यामुळेच आजोबांच्या नावाने असणाऱ्या सभागृहात आणि नागपुरात सादरीकरण करणे हा माझ्यासाठी आनंदाचा विषय असल्याचे मत राहुल यांनी व्यक्त केले. गायक झालो याचे सार्थक येथे मिळते. नागपुरातले रसिकही जाणकार असल्याने सादरीकरण करताना येथे जास्त समाधान मिळते. आतापर्यंत माझे पाच अल्बम बाजारात आले असून, तीन रागदारीवर आधारित तर दोन भक्तिसंगीताचे आहेत. याशिवाय एक मराठी गझलचा अल्बम असल्याची माहिती त्यांनी दिली.