शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शहर सिंगल क्राईम बातम्या..

By admin | Updated: September 6, 2015 23:54 IST

हैदराबाद रोडवरून मालट्रकची चोरी

हैदराबाद रोडवरून मालट्रकची चोरी
सोलापूर : हैदराबाद रोडवरील आंध्र रोडवेज येथे लावण्यात आलेला 6 लाखांचा मालट्रक (क्र.एपी-04 व्ही.4250) चोरून नेल्याप्रकरणी अमिर शेख (रा. मद्रिका कडपा, मध्यप्रदेश) याच्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही चोरी दि.3 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वा झाली. या प्रकरणी नुरमहंमद सनाफ सय्यद (वय 32 रा. 8/209-3 बिस्मिल्लानगर, वायएसआर) यांनी फिर्याद दिली असून, तपास सपोनि रणदिवे करीत आहेत.

क्रेनच्या धडकेत दोघे जखमी
सोलापूर : शिवाजीनगर, मोदी येथे म्हाडा बांधकामावरील बांधकामास लागणारे साहित्य चढविणारे टॉवर क्रेन हायगयने चालवून अंबुबाई अनिल आमलेकर व विष्णू प्रकाश शिंदे यांना जखमी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकुळदास आत्माराम हजगुंडे (वय 30, रा. म्हाडा), महादेव निवृत्ती कदम (वय 47, रा. पुणे) व बी़जी़ शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीचे देखरेख अधिकारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी गंगाराम विश्वनाथ सातपुते (वय 70, रा. शिवाजीनगर, मोदी) यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोसई गोसडे करीत आहेत.

बोगस नळप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
सोलापूर : कल्याणनगर येथील घरांसाठी महापालिकेची रितसर परवानगी न घेता पाईपलाईन फोडून बेकायदा नळ घेतल्याप्रकरणी विजयकुमार विनायक पोरडिया, कमलाबाई नवलसिंग गायकवाड यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मनपा अधिकारी अभिजित बिराजदार यांनी फिर्याद दिली असून, तपास पो.ना. पोळ करीत आहेत.