शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शहर सिंगल क्राईम बातम्या..

By admin | Updated: September 3, 2015 23:52 IST

महिलेस मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा

महिलेस मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा
सोलापूर : समाधाननगर येथील प्लॉटवर गेले असता ताहिरा चाँद पटेल (वय 48, रा. पोलीस मुख्यालय) यांना अज्ञात कारणावरून मारहाण करून मंगळसूत्र घेतल्याप्रकरणी लता राजू बंडा, राजू बंडा, चाँद बाबुलाल शेख व त्याच्या आईविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी 12 वा. घडला. तपास पो.ना. मंठाळकर करीत आहेत.

मारहाणप्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा
सोलापूर : कुमठा नाक्याकडे जात असताना नवसमता सोसायटीजवळ छोटा हत्ती (क्र.एमएच.12 एचडी-1357) पाठीमागे घेत असताना मोटरसायकलला धडक बसल्याने दोघे जखमी झाले. याचा जाब विचारत असताना 8 ते 9 जणांनी शिवीगाळ करीत अमोल कल्याणी कोटीवाले (वय 31 रा. योगीनाथ सोसायटी, शेळगी) यांना लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास सपोनि रणदिवे करीत आहेत.

रिक्षा चालकाकडून प्रवाशाची फसवणूक
सोलापूर : पेट्रोल संपल्याचा बहाणा करून संगमेश बसप्पा भोपळे (वय 31, रा. हुलसूर ता. बसवकल्याण) यांच्याकडून 1 हजाराची नोट घेऊन पळून गेल्याप्रकरणी अफसर चाँद पटेल (रा. नई जिंदगी) व एक अनोळखी रिक्षाचालक याच्याविरूद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी 1.30 ते 11.30 दरम्यान घडला. सोरेगाव येथील डॉ. कुंभार यांच्याकडे उपचारास जात असताना हॉटेल यतिराज येथील पेट्रोल पंपाजवळ रिक्षा (क्र.एम.एच.13 बी.व्ही. 0669) चालकाने पेट्रोल संपल्याचे सांगितले. 1 हजाराची नोट घेऊन चिल्लर आणतो म्हणून निघून गेला तर चाँद पटेल याने फसवणूक केली. तपास पो.हे.कॉ. सय्यद करीत आहेत.

जमावबंदीचा आदेश मोडल्याने गुन्हा दाखल
सोलापूर : सात रस्ता येथून रेल्वे स्टेशनकडे मोटरसायकलवर ट्रिपल सीट बसून घोषणा देत हॉर्न वाजवत जबावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी 17 ते 20 जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी सायंकाळी 7.45 वा. घडला. ओमशंकर मनमोहन पांडे, (वय 20, रा. आसरा), काशिनाथ सुभाष चिंचोळे (वय 24, रा. 97 पाटील नगर), सुभाष शेजवाल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यामध्ये क्रेनला समोर फुलांचा मोठा हार लावण्यात आला होता. तपास पो.हे.कॉ. कांबळे करीत आहेत.

अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन
सोलापूर : भवानी पेठ मड्डीवस्ती, शांतीनगर येथील राहत्या घरी लक्ष्मी बाबू नाटेकर (वय 20) या महिलेने अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरुवारी सकाळी 11.30 वा. घडला. तिला उपचारासाठी सासू सुगलाबाई नाटेकर यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

पाणी समजून विषारी औषध प्राशन
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कौठाळी येथील राहत्या घरी कविता रणजित माने (वय 21) या महिलेने पाणी समजून विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार गुरुवारी सकाळी 11 वा. घडला. तिला त्रास होऊ लागल्याने रणजित माने यांनी कळमण येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

पतीकडून पत्नीस मारहाण
सोलापूर : दारू पिण्यास पैसे देण्याच्या कारणावरून पतीने केलेल्या मारहाणीत अनुराधा चंद्रशेखर कल्याणम ( वय 37, रा. नीलमनगर, एमआयडीसी) ही महिला जखमी झाली. हा प्रकार गुरुवारी दुपारी 3 वा. घडला. पतीने डोक्यास धरून भिंतीवर धडकावले. तिला जखमी अवस्थेत नागमणी कल्याणम यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

दारूच्या नशेत पेटवून घेण्याचा प्रयत्न
सोलापूर : वांगीरोडवरील भूषण नगरातील प्लॉट नं.58 या राहत्या घरी संजय पंडित साळुंखे (वय 43 ) याने गुरुवारी दुपारी 3 वा. दारूच्या नशेत स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्याला उपचारासाठी पत्नी महानंदा साळुंखे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.