शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचे हाल; दूरवरून आणले पाणी

By admin | Updated: March 11, 2016 22:26 IST

जळगाव : ७ रोजी ज्या भागात पाणीपुरवठा झालेला होता, त्या भागात १० रोजी पाणीपुरवठा होईल, या हिशेबाने नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवला होता. मात्र पाईपला गळती दुरुस्ती लांबल्याने गुरूवारी पाणीपुरवठा झालाच नाही. शुक्रवारी देखील सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांचा पाणीसाठा संपून त्यांना पिण्यासाठी देखील पाणी उरले नाही. त्यामुळे नागरिकांना हातपंपावरून, विहीरींवरून पाणी भरून आणावे लागले. नेहरू नगर परिसरातील काही नागरिकांनी तर आंघोळीसाठी थेट मेहरूण तलावावर जाऊन पाण्याचे ड्रम भरून आणले. तर पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपांचा शोध घेत हिंडावे लागले. अनेक नागरिकांनी तर मिनरल वॉटरचे जार विकत आणून वेळ निभावून नेली. स्नेहल कॉलनी, नंदनवननगर परिसरातही चार दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल्

जळगाव : ७ रोजी ज्या भागात पाणीपुरवठा झालेला होता, त्या भागात १० रोजी पाणीपुरवठा होईल, या हिशेबाने नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवला होता. मात्र पाईपला गळती दुरुस्ती लांबल्याने गुरूवारी पाणीपुरवठा झालाच नाही. शुक्रवारी देखील सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांचा पाणीसाठा संपून त्यांना पिण्यासाठी देखील पाणी उरले नाही. त्यामुळे नागरिकांना हातपंपावरून, विहीरींवरून पाणी भरून आणावे लागले. नेहरू नगर परिसरातील काही नागरिकांनी तर आंघोळीसाठी थेट मेहरूण तलावावर जाऊन पाण्याचे ड्रम भरून आणले. तर पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपांचा शोध घेत हिंडावे लागले. अनेक नागरिकांनी तर मिनरल वॉटरचे जार विकत आणून वेळ निभावून नेली. स्नेहल कॉलनी, नंदनवननगर परिसरातही चार दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.

टँकरद्वारे पाणी पुरवण्याची तसदी नाही
मनपाच्या जलवाहिनीची गळती दुरूस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा खंडित करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. आधीच दोन दिवस पाणीपुरवठा न झालेल्या भागात दुरुस्तीमुळे आणखी एक-दोन दिवस उशीराने म्हणजे तब्बल चार-पाच दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होतो. अशा परिस्थितीतही मनपाकडून नागरिकांचे हाल टाळण्यासाठी कोणतीही पर्यायी पाणपुरवठा व्यवस्था केली जात नाही. टँकरद्वारे पाणी पुरवण्याची तसदी देखील मनपाकडून घेतली जात नाही. तर नगरसेवकही सोयीस्करपणे प्रशासनाकडे बोट दाखवून मोकळे होतात. त्याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागतो.