शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टी नाकारल्याने CISF जवानाने अधिका-यांवर झाडल्या गोळ्या

By admin | Updated: January 13, 2017 10:13 IST

सुट्टी नाकारली म्हणून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 13 - निमलष्करी दलातील जवानांनी आपल्याला मिळणा-या असुविधा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या असताना दुसरीकडे सुट्टी नाकारली म्हणून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. चारपैकी दोघे जवान जागीच ठार झाले, तर अन्य दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात हा प्रकार घडला. मृतांत एक सहायक फौजदार आणि तीन हवालदारांचा समावेश आहे.
 
बिहारमधील एका औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात तैनात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) बलवीरसिंग या जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार  केल्याने एकच खळबळ माजली. तो उत्तर प्रदेशच्या अलीगड येथील रहिवासी आहे. नवीननगर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडच्या येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफचे जवान तैनात आहेत. 
 
'रजेच्या मुद्द्यावरून सहकाऱ्यांशी वाद झाल्यानंतर, बलवीरसिंग याचा स्वत:वरील ताबा सुटला आणि त्याने सहकाऱ्यांवर गोळीबार केला', असे पोलीस अधीक्षक डॉ. सत्यप्रकाश यांनी सांगितले. 'रजा मिळत नसल्याने बलवीरसिंग नाराज होता. पण कोणत्याही प्रश्नांची सरळ उत्तरे देत नव्हता', असंही त्यांनी सांगितलं आहे. 
 
बलवीरने सर्व्हिस रायफलमधून सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. त्यात दोन जण जागीच ठार झाले, तर दोघांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे ते मरण पावले. रात्री साडेबारा वाजता एका गटाची पाळी संपून दुसऱ्या गटाची पाळी सुरू होत असताना ही घटना घडली.
 
बलबीरने चौघांवर गोळ्या झाडल्यानंतर उर्वरित सहकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. बरवीरसिंग दोन महिन्यांच्या योग प्रशिक्षणानंतर नुकताच कामावर परतला होता. त्याच्या रजेबाबत काही तक्रारी होत्या, असे सांगण्यात आले.  घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.