शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमा परीक्षण- अंकात अवश्य - सेकंड हँड हसबंड - दुसर्‍या विवाहाच्या नावावर निरर्थक कथा

By admin | Updated: July 3, 2015 23:00 IST

रेटिंग - १ स्टार

रेटिंग - १ स्टार
विवाहित जीवनाचे अनेक प्रश्न असतात, वेळीच ते सुटले नाहीत तर , घटस्फोटाची वेळ येते आणि घटस्फोट झाल्यानंतर येणारे एकाकीपण ही नवी समस्या समोर येते. या थीमवर बनविण्यात आलेल्या सेकंड हसबंड या चित्रपटाची कथा खरेतर चांगली होती, पण दिग्दर्शक व लेखक या जोडीला त्यातून उत्कृष्ट चित्रपट बनविता आला नाही.
चंदीगड येथील अलीशान हॉटेलचा मालक अजीतसिंग ( धर्मेंद्र) , आपल्या पत्नी (रती अग्निहोत्री ) सह राहात असतो. पण दारू व दुसर्‍या महिलांसोबत असणार्‍या संबंधामुळे पती-पत्नीत तणाव निर्माण होतो. हा तणाव वाढत अखेर घटस्फोटापर्यंत पोहोचतो. अजीतच्या हॉटेलचा मॅनेजर राजबीर (जिप्पी गे्रवाल) आपल्याच आयुष्यातील समस्यामुळे त्रस्त आहे. राजबीरचा आपली पत्नी नेहा (गीता बसरा) शी घटस्फोट झाला आहे. पण न्यायालयाच्या निकालानुसार राजबीरला नेहाला पोटगीच्या नावर मोठी रक्कम द्यावी लागते. त्यामुळे तो मैत्रीण गुरप्रीत (टीना आहुजा) शी विवाह करु शकत नाही.
पोलिस इन्स्पेक्टरला (विजयराज) नेहाचे आकर्षण आहे, पण तिला तो आवडत नाही. विजयराजची पत्नी मरण पावली असून तो दुसर्‍या पत्नीच्या शोधात आहे. नेहाला अजीत आवडतो, पण तो घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच आपल्या पत्नीकडे परत जातो. नेहाला हवा तसा जोडीदार मिळतो. राजबीर - गुरप्रीत यांचा मार्ग मोकळा होतो.
चित्रपटाची कमजोर बाजू- दिग्दर्शक समीप कांग यांच्याकडे या कथानकातून एक चांगला चित्रपट बनविण्याची संधी व मसाला दोन्हीही होते. पण दिग्दर्शक म्हणून ते या कथानकाला न्याय देऊ शकले नाहीत. परिणामी चित्रपट ढिसाळ व नीरस झाला. पंजाबी स्टाईल चित्रपट बनविण्याच्या प्रयत्नात त्यानी सर्व अतीवापरामुळे गुळगुळीत झालेले मसाले वापरले. चित्रपटाची कथा कमजोर झाली व बाकी कसर कलाकारांनी भरुन काढली. चित्रपटाचे हिरो जिप्पी ग्रेवाल प्रभावहीन आहेत, गीता बसराकडून अभिनयाची अपेक्षा नव्हतीच , पण ग्लॅमरमध्येही ती फेल गेली. टीना आहुजा या नावाने चित्रपट क्षेत्रात प्रवेश करणार्‍या गोविंदाच्या मुलीने निराश केले. मुकेश तिवारीपासून संजय मिश्रा व रती अग्निहोत्री पासून विजयराजपर्यंत , आलोकनाथ, रवीकिशन या सर्वांचीच कामे बेताची झाली आहेत. पंजाबी स्टाईल गाणी भरपूर आहेत, पण दर्जा नाही. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून समीप कांग फेल ठरले आहेत.