सिडकोच्या शिल्लक घरांची मार्चनंतर सोडत सिडकोचा निर्णय: विविध आकाराच्या २७२ सदनिकांचा समावेश
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
नवी मंुबई: सिडकोने विविध विभागात बांधलेल्या गृहप्रकल्पात शिल्लक राहिलेल्या घरांसाठी मार्चनंतर सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. खारघर येथील वास्तुविहार, सेलिब्रेशन आणि उलवे येथील उन्नती प्रकल्पात जवळपास २७२ सदनिका शिल्लक आहेत. विविध संवर्गातील आरक्षणानुसारच या सदनिकांची सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
सिडकोच्या शिल्लक घरांची मार्चनंतर सोडत सिडकोचा निर्णय: विविध आकाराच्या २७२ सदनिकांचा समावेश
नवी मंुबई: सिडकोने विविध विभागात बांधलेल्या गृहप्रकल्पात शिल्लक राहिलेल्या घरांसाठी मार्चनंतर सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. खारघर येथील वास्तुविहार, सेलिब्रेशन आणि उलवे येथील उन्नती प्रकल्पात जवळपास २७२ सदनिका शिल्लक आहेत. विविध संवर्गातील आरक्षणानुसारच या सदनिकांची सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोने २00८ मध्ये खारघर सेक्टर १६ आणि १७ मध्ये वास्तुविहार आणि सेलिब्रेशन गृहप्रकल्पातील २१४४ घरांची सोडत काढली होती. विविध आर्थिक घटकांना समोर ठेवून हा गृहप्रकल्प साकारण्यात आला होता. यात केएच-१, केएच-२, केएच-३ आणि केएच-४ टाईपच्या घरांचा समावेश होता. यातील विविध टाईपच्या १९३ सदनिका विक्री न झाल्याने पडून आहेत. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या या सदनिका सोडत काढून पुन्हा विकण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्याचप्रमाणे उन्नती प्रकल्पातील ७९ घरेही विक्रीसाठी काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या शिल्लक घरांच्या किमती सध्याच्या दरानुसार असणार आहेत. विशेष म्हणजे सिडकोने उभारलेल्या विविध गृहप्रकल्पातील शिल्लक घरांची सोडत काढण्यासाठी संचालक मंडळाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. मात्र विविध कारणांमुळे ही सोडत रखडली होती. असे असले तरी आता मार्चनंतर ही सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी दिली. (प्रतिनिधी)चौकट शिल्लक घरांचा तपशीलया सोडतीत सर्वसामान्यांसाठी केएच३ प्रकारातील ४२ तर केएच ४ प्रकारातील ७८ घरे उपलब्ध होणार आहेत. अनुसूचित जातीसाठी केएच ३ मधील ५ तर केएच ४ मधील १५ घरे, अनुसूचित जमातीसाठी केएच३ १० तर केएच ४ मधील १७ भ.ज. साठी केएच ३ मधील ३ तर केएच ४ मधील १, वि.ज. साठी केएच३ मधील १ तर केएच ४ मधील २, राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी केएच ३ मधील ५ तर केएच ४ मधील ८ घरे तसेच प्रथमच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी ५ टक्के आरक्षणानुसार केएच ३ मधील २ तर केएच ४ मधील ४ सदनिका उपलब्ध होणार आहेत.