पोलीस पाटलाच्या खुनाचा तपास सीआयडीकडे
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
- यवतमाळ जिल्हा दारूबंदी आंदोलन तीव्र
पोलीस पाटलाच्या खुनाचा तपास सीआयडीकडे
- यवतमाळ जिल्हा दारूबंदी आंदोलन तीव्र यवतमाळ : दारूबंदी चळवळीतील कार्यकर्ता आणि यवतमाळ तालुक्यातील यावलीचे (इजारा) पोलीस पाटील वीरेंद्र नामदेव राठोड (५५) यांच्या खुनाचा तपास शासनाने राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे सोपविला आहे.यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी यासाठी गावागावात आंदोलन पेटले आहे. शासनाच्या दारूबंदीच्या घोषणेची प्रतीक्षा न करता गावकरी स्वत:च दारू पकडण्यासाठी मोहीम राबवित आहे. अशा मोहिमेतूनच २ जुलै रोजी यावली (ईजारा) येथे गावकरी व अवैध दारू विक्रेत्यांमध्ये वाद झाला. या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेले वीरेंद्र राठोड यांचा खून करण्यात आला. संतप्त गावकर्यांनी दुसर्याच दिवशी त्यांचा मृतदेह घेऊन पालकमंत्री संजय राठोड यांच्या संपर्क कार्यालयावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. या प्रकरणात वडगाव जंगलच्या पोलीस कर्मचार्याला निलंबित करुन पाच जणांना अटक करण्यात आली होती. या खुनाचा सखोल तपास व्हावा म्हणून शासनाने हे प्रकरण आता सीआयडीकडे सोपविले आहे. पोलीस उपअधीक्षक एस.डी. सोळंके या गुन्ह्याचा तपास करणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)