शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेसाठी काँग्रेसमध्ये चुरस

By admin | Updated: February 8, 2016 03:21 IST

राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात चुरस सुरू झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल पंजाबमधून पुन्हा राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे

हरीश गुप्ता,  नवी दिल्लीराज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात चुरस सुरू झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल पंजाबमधून पुन्हा राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी सिब्बल यांना आपल्या राज्यातून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठविण्यात रस दाखविला असला तरी हिमाचलमधून आनंद शर्मा यांना उमेदवारी देण्याकडे पक्षश्रेष्ठींचा कल असल्याचे समजते.सध्या राज्यसभेवर राजस्थानमधून निवडून आलेले शर्मा येत्या जुलैमध्ये निवृत्त होत आहेत; पण आता राजस्थानमधून राज्यसभेच्या चारपैकी एकही जागा जिंकण्यासारखी काँग्रेसची स्थिती नाही. त्यामुळे राज्यसभेतील पक्षाचे आघाडीचे नेते असलेले व गांधी कुटुंबाच्या जवळचे मानले जाणारे शर्मा दीर्घ कालानंतर पुन्हा एकदा हिमाचल या आपल्या मूळ राज्यातून राज्यसभेवर जातील. सध्या हिमाचलमधून निवडून आलेल्या भाजपच्या बिमला कश्यप निवृत्त होत आहेत. तेथील विधानसभेतील विद्यमान पक्षीय बलाबलानुसार यावेळी भाजपला एक जागा कमी निवडून आणता येईल व ती काँग्रेसच्या वाट्याला जाईल.काँग्रेसचे राज्यसभेतील तब्बल २१ सदस्य यावेळी निवृत्त होत असून, विविध राज्य विधानसभांमधील पक्षीय बलाबल पाहता यापैकी फक्त ११ जागा पुन्हा जिंकणे काँग्रेसला शक्य होईल. मणिशंकर अय्यर व डॉ. भालचंद्र मुणगेकर हे दोन नामनिर्देशित सदस्यही निवृत्त होत आहेत. हे दोघे नेमणूक झााल्यानंतर काँग्रेसमध्ये सामील झाले होते. पंंजाबमधील राज्यसभेच्या तीन जागा स्वत:कडेच कायम राखण्याच्या स्थितीत काँग्रेस आहे. पंजाबमधून राज्यसभेच्या एकूण सात जागांची निवडणूक व्हायची आहे. त्यापैकी अंबिका सोनी आपली जागा कायम ठेवू शकतील, हे नक्की दिसत आहे.