ख्रिश्चन शाळेवर हल्ला : जोड
By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST
गृहमंत्रालय देऊ शकते चौकशीचे आदेश
ख्रिश्चन शाळेवर हल्ला : जोड
गृहमंत्रालय देऊ शकते चौकशीचे आदेशनवी दिल्ली: दिल्लीतील चर्चवर एकापाठोपाठ एक होणारे हल्ले आणि आज शुक्रवारी एका ख्रिश्चन शाळेत झालेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालय याप्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देऊ शकते़गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चर्च आणि ख्रिश्चन संस्थांवर होत असलेल्या या हल्ल्यांमागे एखादा विशिष्ट समूह वा संघटनेचा हात आहे का? आणि यासाठी चौकशीचे आदेश दिले जाऊ शकतात, यावर गृहमंत्रालयाचा विचार सुरू आहे़ ख्रिश्चनांच्या धार्मिक संस्थांवरील हल्ल्यामागे कोण आहे, त्यांचा हेतू काय, आम्हाला ठाऊक नाही़ मात्र आम्हाला याचे विश्लेषण करायचे आहे़