शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला विक्रेत्यांना स्थलांतराचे आवाहन चौबे चौक ते बेंडाळे चौक : पक्के अतिक्रमणही काढणार

By admin | Updated: March 15, 2016 00:33 IST

जळगाव : मनपा नगररचना विभागाने चौबे चौक ते सुभाष चौक व तेथून बेंडाळे चौकापर्यंतच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या पक्क्या अतिक्रमणांची मोजणी करून त्यावर खुणा केल्या. त्यांना स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे तर या रस्त्यावरील हॉकर्सला गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतरित होण्याचे आवाहन अतिक्रमण विभागातर्फे करण्यात आले आहे.

जळगाव : मनपा नगररचना विभागाने चौबे चौक ते सुभाष चौक व तेथून बेंडाळे चौकापर्यंतच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या पक्क्या अतिक्रमणांची मोजणी करून त्यावर खुणा केल्या. त्यांना स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे तर या रस्त्यावरील हॉकर्सला गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतरित होण्याचे आवाहन अतिक्रमण विभागातर्फे करण्यात आले आहे.
नगररचना विभागाच्या पथकाने शुक्रवारीच या रस्त्याचा नकाशा तयार केला होता. त्यानुसार सोमवारी या रस्त्याची दोन्ही बाजूने मोजणी करून अतिक्रमणात असलेल्या पक्क्या बांधकामांवर खुणा करण्यात आल्या. सोमवारी एकाच दिवसात हे काम पूर्ण करण्यात आले. त्यासाठी नगररचना विभागातील सर्व अभियंते कामाला लागले होते. तर अतिक्रमण विभागातर्फे या दुकानदारांना स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले जात होते.
आयुक्तांची घेतली भेट
सायंकाळी या रस्त्यावरील दुकानदारांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. हा रस्ता आधीच रूंद असल्याने बांधकाम न तोडण्याची मागणी केली. मात्र जे बांधकाम अतिक्रमणात असेल, ते तोडण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
---- इन्फो---
हॉकर्सचा अतिक्रमणच्या पथकाशी वाद
शिवाजी रोडच्या कोपर्‍यावर काही फळ विक्रेत्यांनी पुन्हा गाड्या लावण्याचा प्रयत्न केल्याने अतिक्रमण विभागाचे पथक सोमवारी दुपारी तेथे कारवाईसाठी गेले. त्यावेळी संबंधित हॉकर्सने अरेरावी करीत, वाद घातला. त्यामुळे तेथे गर्दी जमली होती. अखेर मनपाच्या पथकाने लोटगाडी जप्त केली.
---- इन्फो---
शिवाजीरोडवर चौकातील अतिक्रमण तोडले
शिवाजी रोडवरील जुना कापड बाजारातील चौकातील वर्मा ट्रान्सपोर्टचे अतिक्रमण मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने तोडले.