शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

छोटू भोयर यांचा नासुप्र विश्वस्तपदाचा राजीनामा -- भाग १

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

- इच्छुकांची फिल्डिंग सुरू : नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. छोटू भोयर यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नासुप्रमध्ये महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे हे एकमेव लोकनियुक्त विश्वस्त उरले आहेत. भोयर यांच्या राजीनाम्यानंतर विश्वस्तपदी वर्णी लावण्यासाठी भाजपमध्ये जोरात लॉबिंग सुरू झाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये ...


- इच्छुकांची फिल्डिंग सुरू :
नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. छोटू भोयर यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नासुप्रमध्ये महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे हे एकमेव लोकनियुक्त विश्वस्त उरले आहेत. भोयर यांच्या राजीनाम्यानंतर विश्वस्तपदी वर्णी लावण्यासाठी भाजपमध्ये जोरात लॉबिंग सुरू झाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा काँग्रेससारखे वातावरण पहायला मिळण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेतील प्रतिनिधी म्हणून नासुप्रवर एख विश्वस्त निवडला जातो. २८ नोव्हेंबर २०१२ रोजी डॉ. छोटू भोयर यांची विश्वस्तपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळीही पक्षात इच्छुकांची मोठी रांग असल्यामुळे भाजप नेत्यांना निर्णय घेणे जड गेले होते. पण शेवटी भोयर यांनी बाजी मारली. त्यावेळी नाराजांना दिलासा देण्यासाठी भोयर यांची नियुक्ती अडीच वर्षांसाठी असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. भोयर यांची अडीच वर्षे पूर्ण होत आली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले नगरसेवक मुन्ना यादव यांच्या नावाची विश्वस्तपदासाठी चर्चा सुरू झाली. मात्र, काही महिन्यांपूर्वी यादव यांची कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा मिळाला. त्यामुळे भोयर कायम राहतील, असे संकेत मानले जात होते. भोयर सुमारे सव्वातीन वर्षे विश्वस्तपदावर कायम राहिले. शेवटी भोयर यांनी २५ ऑगस्ट रोजी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सोपविला. पक्षनेत्यांनी ३१ ऑगस्ट रोजी नासुप्र सभापतींकडे राजीनामा पाठविला व तो मंजूर करण्यात आल्या.
चौकट...
सिंगारे उरले एकमेव विश्वस्त
- नासुप्रमध्ये आता लोकनियुक्त विश्वस्त म्हणून एकमेव रमेश सिंगारे कार्यरत आहेत. शासनातर्फे नियुक्त करण्यात येत असलेल्या दोन विश्वस्तांची पदे भरलीच गेली नाहीत. आमदारांमधून एक विश्वस्त नेमला जातो. तेही पद रिक्त आहे. आता भोयर यांच्या राजीनाम्यामुळे नगरसेवकांमधून निवडले जाणारे पदही रिक्त झाले आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारच्या काळात आपसातील रस्सीखेच व पक्षांतर्गत मतभेदांमुळे पदे रिक्त ठेवली जात होती. मात्र, आता १५ वर्षानंतर सत्तेत आलेल्या भाजपचीही काँग्रेसच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे दिसते, अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.