शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 06:50 IST

उदयनिधी स्टॅलिन  चेपॉक-तिरुवल्लिकेनी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत

चेन्नई: द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमुक) नेते व उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शुक्रवारी चेन्नईच्या आपल्या चेपॉक-तिरुवल्लिकेनी विधानसभा मतदारसंघात रोड-शो केला. ते या मतदारसंघात दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.

द्रमुकच्या नेतृत्वाखालील सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्सच्या (एसपीए) उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार करत असलेले उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, स्वतः उमेदवार असूनही राज्यात ‘द्रविड मॉडेल २.०’ सरकार स्थापन करण्यासाठी ते राज्यभर आघाडीसाठी मते मागत आहेत.

उदयनिधी यांनी प्रचारादरम्यान जनतेला आवाहन केले की, द्रमुकच्या उमेदवारांना विधानसभेत पाठवणे म्हणजेच ‘माझा विजय निश्चित करणे’ आहे. आपण स्वत: निवडणूक लढवत असलो तरी अद्याप मतदारसंघात पूर्ण क्षमतेने प्रचार सुरू केला नसल्याचा दावाही त्यांनी केला. 

करुणानिधींचा मतदारसंघ

शुक्रवारी ज्या भागांत उदयनिधींनी रोड-शो केला त्याच मतदारसंघातून त्यांचे आजोबा आणि माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी १९९६, २००१ आणि २००६ मध्ये सलग तीन वेळा विजय मिळवला होता. उदयनिधींनी २०२१ची निवडणूक जिंकण्यापूर्वी द्रमुकचे जे. अनबलगन यांनी २०११ मध्ये आणि २०१६ मध्ये ही जागा जिंकली होती.

‘अण्णाद्रमुकमध्ये वैयक्तिक हल्ल्यांची परंपरा’, कनिमोळींवरच्या वक्तव्यावरून द्रमुक आक्रमक

अण्णाद्रमुकचे सरचिटणीस ई. के. पलानीस्वामींनी द्रमुक नेत्या कनिमोळी यांच्याबाबत केलेल्या कथित अवमानकारक  टिप्पणीबद्दल द्रमुक नेत्यांनी शुक्रवारी पलानीस्वामींवर हल्ला चढवला. अशा वक्तव्यांतून त्यांच्यात दडलेली पराभवाची भीती दिसून येते. हे विरोधी पक्षनेते निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहतील याची चिंता त्यांना सतावत आहे, असे द्रमुकने म्हटले. 

कनिमोळींनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर विश्वास ठेवणे सुरूच ठेवले तर त्यांना पुन्हा तिहार तुरुंगात जावे लागेल, असे वक्तव्य पलानीस्वामींनी केले होते. २०११ मध्ये २-जी स्पेक्ट्रम प्रकरणात त्यांना अटक झाली होती. निर्णय घेण्याची क्षमता कनिमोळींकडे नाही, जबाबदारी नसताना त्या बोलत असतात असे पलानीस्वामी म्हणाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : DMK Candidate's Victory Ensures My Win: Deputy CM Udhayanidhi Stalin

Web Summary : Udhayanidhi Stalin campaigned for DMK candidates, stating their victory ensures his. He highlighted the 'Dravidian Model 2.0' and referenced his grandfather Karunanidhi's legacy in the constituency. DMK criticized Palaniswami's remarks about Kanimozhi, alleging fear of defeat.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूElectionनिवडणूक 2026