नवी दिल्ली : देशाच्या विविध भागांत सक्रिय असलेल्या संघटित टोळ्यांकडून प्रवाशांकडील वस्तू, डिङोल, पेट्रोल तसेच धान्याच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत, अशी कबुली रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी राज्यसभेत खा. विजय दर्डा यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.
रेल्वे दावे लवाद किंवा न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 2क्11 मध्ये 1क् हजार 3क्क्, 2क्12 मध्ये 22 हजार 95क् तर 2क्13 मध्ये 69 हजार क्78 रुपयांचे अंशत: नुकसान देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी गेल्या तीन वर्षात झालेल्या चो:यांबाबत विस्तृत माहिती दिली.
3445 पदे रिक्त
च्रेल्वेत तिकीट कलेक्टर आणि तपासनीसांची 3445 पदे रिक्त असून ती भरण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. टीसी आणि टीईएस या पदांसाठी 14क्7 उमेदवारांची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
(2क्11मध्ये रेल्वेने चो:यांमध्ये सहभागी 163 संघटित टोळ्यांची ओळख पटवली आहे. डिङोल, पेट्रोल आणि धान्य चोरीच्या अनुक्रमे 7, 1 आणि 7क् घटना उघडकीस आल्या. 2क्13 मध्ये डिङोल आणि धान्यचोरीच्या अनुक्रमे 1क् अािण 67 घटनांची नोंद झाली. 217 जणांना अटक झाली होती.)
च्एप्रिल- मे 13 या काळात मुंबई आणि लखनौ येथे विनातिकीट प्रवास करणा:या 18 लाख लोकांना पकडण्यात आले. या दोन शहरांमध्ये या काळात 3764 रेल्वे प्रवाशांवर गुन्हे नोंदण्यात आले. त्यापैकी 3551 प्रवासी एकटय़ा मुंबईत पकडले गेल्याचे सिन्हा यांनी राज्यसभेत अन्य एका सदस्याने विचारलेल्या उत्तरात सांगितले.
च्मुंबईत लोकलसह नऊ ठिकाणी अचानक तपासणी पार पाडण्यात आली. त्यातून 9 लाख 97 हजार 71क् रुपये दंड वसूल करण्यात आला. तिकीट कलेक्टरची पदे रिक्त असल्यामुळे फुकट प्रवासाचे प्रकार वाढले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.