दहा शरीरसौष्ठवपटूंची निवड
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
मडगाव : उज्जैन (मध्य प्रदेश) येथे होणार्या महापौर चषक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी गोवा संघाच्या वतीने १० स्पर्धकांची निवड करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा १० व ११ जानेवरी दरम्यान होईल. स्पर्धेसाठी निवड चाचणी मडगाव येथील मॅक्सन फिटनेस हबमध्ये १४ डिसेंबर रोजी झाली. या वेळी गोवा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, रवी देसाई व संतोष म्हापसेकर उपस्थित होते. निवडलेले खेळाडू ९ जानेवारी रोजी रवाना होतील. चाचणीत २१ स्पर्धकांचा सहभाग होता. निवडण्यात आलेले शरीरसौष्ठवपटू खालीलप्रमाणे- शुभम गावस, महंमद सलीम, मातादन मुल्ला, सतीश कुंकळ्ळीकर, प्रतोष पिळर्णकर, उमेश शिरवईकर, विष्णू उसकईकर व गॉडविन मिनेझिस यांचा समावेश आहे.
दहा शरीरसौष्ठवपटूंची निवड
मडगाव : उज्जैन (मध्य प्रदेश) येथे होणार्या महापौर चषक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी गोवा संघाच्या वतीने १० स्पर्धकांची निवड करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा १० व ११ जानेवरी दरम्यान होईल. स्पर्धेसाठी निवड चाचणी मडगाव येथील मॅक्सन फिटनेस हबमध्ये १४ डिसेंबर रोजी झाली. या वेळी गोवा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, रवी देसाई व संतोष म्हापसेकर उपस्थित होते. निवडलेले खेळाडू ९ जानेवारी रोजी रवाना होतील. चाचणीत २१ स्पर्धकांचा सहभाग होता. निवडण्यात आलेले शरीरसौष्ठवपटू खालीलप्रमाणे- शुभम गावस, महंमद सलीम, मातादन मुल्ला, सतीश कुंकळ्ळीकर, प्रतोष पिळर्णकर, उमेश शिरवईकर, विष्णू उसकईकर व गॉडविन मिनेझिस यांचा समावेश आहे. ढँङ्म३ङ्म : 1912-टअफ-09कॅप्शन: निवडण्यात आलेल्या शरीरसौष्टवपटंूसमवेत जीबीबीएफचे पदाधिकारी.