शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिन्नमांचे भवितव्य ठरणार आजच!

By admin | Updated: February 14, 2017 04:15 IST

मुख्यमंत्री होण्यासाठी उतावीळ झालेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांच्यासंबंधीच्या ६0 कोटी रुपयांच्या बेहिशोबी

नवी दिल्ली/ चेन्नई : मुख्यमंत्री होण्यासाठी उतावीळ झालेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांच्यासंबंधीच्या ६0 कोटी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्तेच्या खटल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता देणार आहे. या खटल्यात शशिकला दोषी ठरल्यास त्यांना मुख्यमंत्रीही होता येणार नाही आणि कदाचित त्यांची तुरुंगातही रवानगी होईल. मात्र त्या निर्दोष ठरल्यास शपथविधीसाठी राज्यपाल त्यांना पाचारण करतील.तामिळनाडूतील सत्तासंघर्षात मंगळवार, म्हणजे उद्याचा निर्णय निर्णायक ठरणार आहे. न्या. पी. सी. घोष आणि न्या. अमिताव रॉय यांचे खंडपीठ कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या एका याचिकेसह अनेक याचिकांवरील आपला आदेश देईल. या खटल्यातील मुख्य आरोपी तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता व शशिकला यांच्यासह अन्य तीन आरोपी निर्दोष सुटल्याच्या निर्णयाला याचिकांद्वारे आव्हान दिले गेले आहे. जयललिता आता हयात नसल्यामुळे त्यांच्यावरील खटला संपविला जाईल. या खटल्यातील आरोपींत शशिकला यांचे नातेवाईक व्ही. एन. सुधाकरन आणि एलावारासी आहेत. खालच्या न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवले होते, तर कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निवाड्यावरच शशिकला यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. शशिकला या जर दोषी आढळल्या तर त्यांना विधानसभेची निवडणूकही लढवता येणार नाही. शशिकला यांची ५ फेब्रुवारी रोजी विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली. अण्णा द्रमुक पक्षात बहुमत कोणाच्या (मुख्यमंत्री पनीरसेल्वम की शशिकला) पाठीशी आहे याची परीक्षा घेण्यासाठी राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन आठवडाभरात बोलवावे, असा सल्ला महाअधिवक्ता मुकुल रोहटगी यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना दिला आहे. मात्र तो सल्ला राज्यपालांवर बंधनकारक नाही. सर्वोच्च न्यायालयाने जगदंबिका पाल प्रकरणात विधिमंडळातच आमदार कोणाच्या पाठीशी आहेत याची परीक्षा घेण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे राज्यपालांनी एक आठवड्याच्या आत तमिळनाडू विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, असे मत रोहटगी यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. शशिकला यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यापासून राव यांनी गुरुवारपासून निर्णय घेतलेला नाही. (वृत्तसंस्था)