शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अम्मांनंतर ‘चिनम्मा’

By admin | Updated: February 6, 2017 03:20 IST

तब्बल तीन दशकांपासून जयललिता यांच्या निकटवर्तीय म्हणून वावरलेल्या शशिकला यांची रविवारी अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे

चेन्नई : तब्बल तीन दशकांपासून जयललिता यांच्या निकटवर्तीय म्हणून वावरलेल्या शशिकला यांची रविवारी अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचा मार्ग प्रशस्त झाला आहे. तामिळनाडूत अम्मांनंतर आता चिनम्मा यांचे राज्य असेल. पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.शशिकला एक महिन्यांपूर्वीच पक्षाच्या महासचिव झाल्या होत्या. त्या मंगळवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगितले जात आहे. दोन महिन्यांच्या काळात राज्यातील त्या तिसऱ्या मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी येथे पक्षाच्या मुख्यालयात आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्यासाठी शशिकला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. आमदारांनी सर्वसंमतीने त्यावर शिक्कामोर्तब केले. शशिकला पक्ष मुख्यालयात दाखल होताच पनीरसेल्वम आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. या निवडीनंतर बोलताना शशिकला म्हणाल्या की, ‘जयललिता यांच्या मृत्यूनंतर सर्वात प्रथम पनीरसेल्वम यांनीच मला महासचिवपदासाठी तयार केले. जयललिता यांच्या मृत्यूनंतर पक्षात फूट पडेल, असे विरोधकांना वाटत होते, पण त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत.’ दरम्यान शशीकला यांचे पती नटराजन यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रात्री उशीरा रूग्णालयात दाखल करण्यात आले.जयललिता यांच्या मृत्यूनंतर प्रथम पनीरसेल्वम यांनीच मला पक्ष महासचिव आणि मुख्यमंत्री होण्याचा आग्रह केला, पण अम्मांच्या मृत्यूमुळे मी काहीही ऐकू न घेण्याच्या स्थितीत नव्हते. जयललितांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आपण महासचिव होण्यासाठी तयारी दर्शविली. आपल्या अश्रूंना वाट करून देताना त्या म्हणाल्या की, ‘मी अम्मांचे स्वप्न पूर्ण करणार आहे.