शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या मंदीचा भारतीय शेअर बाजाराला फटका, सेन्सेक्स २५ हजारच्या खाली

By admin | Updated: January 7, 2016 14:29 IST

चीनच्या शेअर बाजारातील अर्थमंदीचे परिणाम भारतीय शेअरबाजारावर होत आहे. गुरुवारी सकाळी चीनच्या शेअर बाजारात ७ टक्के घसरण झाली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - चीनच्या शेअर बाजारातील मंदीचा विपरीत परिणाम भारतीय शेअरबाजारावर होत आहे. गुरुवारी सकाळी चीनच्या शेअर बाजारात ८ टक्के घसरण झाली. त्याचे  परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आले.  मुंबई शेअर बाजारात ५०० अंकांची घसरण होऊन सेन्सेक्स २५ हजारांच्या खाली आला. 
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा  निर्देशांकसुध्दा ७६०० च्या खाली आला. चीनचे चलन युआनमध्येही घसरण झाली आहे. या घसरणीमुळे चीनच्या शेअर बाजारात अधिक पडझड रोखण्यासाठी वेळेआधीच व्यवहार थांबवण्यात आले.  आठवडयाभरात दुस-यांदा चीनवर शेअर बाजार नियोजित वेळेआधीच बंद करण्याची वेळ ओढवली आहे.  
नव्यावर्षाच्या पहिल्या दिवसापासून मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये १००० अंकांची घसरण झाली आहे. जगातील दुस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा मंदीच्या दिशेने सुरु झालेल्या प्रवासाचा भारतीय शेअर बाजाराला फटका बसत असून, भारतीय अर्थव्यवस्थेवरही त्याचे पडसाद दिसू शकतात.
 
भारतीय शेअर बाजार घसरण्याची मुख्य कारणे:
 
- चिनी चलन युआनमध्ये सातत्याने होत असलेली घसरण.
- पीपल्स बँक ऑफ चायनाने युआनचा रेफरन्स रेट एप्रिल २०११ च्या पातळीवर नेऊन ठेवला. थोडक्यात युआनचा हा पावणे पाच  वर्षांतला नीचांक आहे.
- हाँगकाँगच्या फ्री ट्रेडिंग मार्केटमध्येही युआन १.३ टक्क्यांनी घसरला.
- चिनी शेअर बाजाराचे कामकाज बंद ठेवण्यात आले, तीन दिवसात ही वेळ दुस-यांदा आली.
- जागतिक बँकेने जगाची अर्थव्यवस्था कूर्मगतीने वाढेल असे भाकित केले. आधी वाढीचा अंदाज २०१६मध्ये ३.३ टक्के होता, जो जागतिक बँकेने कमी करून २.९ टक्के इतका कमी केला.
- चीनच्या घटत्या मागणीमुळे खनिज तेलाटे भाव आणखी गडगडले. खनिज तेलाच्या भावांनी ११ वर्षांतला नीचांक, ३५ डॉलर्स प्रति बॅरल इतका गाठला आहे.