शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चीनचं रॉकेट परीक्षण फेल झाल्यानं भारताला स्पेस लीडर बनण्याची संधी

By admin | Updated: July 4, 2017 16:48 IST

लाँग मार्च 5 या रॉकेटच्या परीक्षणात अपयश आल्यामुळे चीनच्या अवकाश कार्यक्रमाला मोठा धक्का बसला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 4 - लाँग मार्च 5 या रॉकेटच्या परीक्षणात अपयश आल्यामुळे चीनच्या अवकाश कार्यक्रमाला मोठा धक्का बसला आहे. चीनचं रॉकेट परीक्षण फेल झाल्यामुळे चंद्रावरून नमुना आणण्याच्या चीनच्या अभियानाला झटका बसला आहे. त्यामुळे चीनचा प्रतिस्पर्धी असलेल्या भारतालाही पुढे जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतानं आधीच मंगळयान यशस्वीरीत्या मंगळ ग्रहावर पाठवलं आहे. तसेच त्या ग्रहासोबत 104 इतर उपग्रहही पाठवून अवकाश संशोधन क्षेत्रात पुढे असल्याचं भारतानं सिद्ध केलंय.

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, चीनचा अंतरिक्ष कार्यक्रम तंत्रज्ञानाच्या जगातही संकटांनी घेरलेला आहे. चीननं स्वतःच्या अवकाश कार्यक्रमातील अपयश टाळण्यासाठी खूपच सावधानी बाळगली होती. मात्र एक ना एक दिवस असं होणार हे माहितीच होतं, असं चीनचे अवकाश संशोधन कार्यक्रमाचे तज्ज्ञ जोआन जॉनसन फ्रीज म्हणाले आहेत. 2 जुलै रोजी प्रक्षेपणादरम्यान अनियमिततेमुळे चीनला दुस-यांदा मालवाहक रॉकेट लाँग मार्च 5च्या परीक्षणात अपयश आलंय. चीनच्या दक्षिण प्रांतातील हैनानमधल्या वेनचांग येथील अवकाश तळावरून 2 तारखेला रविवारी संध्याकाळी स्थानिक वेळेनुसार 7 वाजून 23 मिनिटांनी या रॉकेटनं उड्डाण केलं होतं. मात्र अनियमिततेमुळे ते परीक्षण फेल झालं होतं. सर्वात वजनदार शिजियान -18 या उपग्रहाला उड्डाण करायचे होते. चीन यंदा चांग - 5 रॉकेटला चंद्र अभियानासाठी रवाना करण्याआधीच लाँग मार्च 5 या रॉकेटच्या परीक्षणात अपयश आलं आहे. शिजियान -18 या उपग्रहाचं वजन 7.5 टन इतके असून, त्यात चीननं अत्याधुनिक प्रणाली बसवली होती. अवकाशात कार्यक्रमात चीननं आतापर्यंतचा सर्वात वजनी उपग्रह प्रक्षेपित केला होता.(VIDEO : इस्त्रोने एकाचवेळी 31 उपग्रहांचे केले यशस्वी प्रक्षेपण)भारताने दाखवला ‘१०४ का दम’, इस्त्रोचा विश्वविक्रमगेल्या काही दिवसांपूर्वीच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला होता.  अंतराळ मोहिमेत इस्रोनं आणखी एक पाऊल पुढे टाकले. अत्याधुनिक संचार उपग्रह जीसॅट 17 चे गुरुवारी फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. ‘एरियन- 5’ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून जीसॅट 17 हे अंतराळात झेपावले होते.जीसॅट 17चे वजन जवळपास 3477 किलोग्रॅम एवढे आहे. या उपग्रहात दूरसंचार सेवेसाठी नॉर्मल सी बँड, एक्स्टेंडेड सी बँड आणि सी बँड आहे. यात हवामानासंबंधी माहिती मिळवण्यासाठी उपकरणही बसवण्यात आले आहे. शिवाय सर्च आणि रेस्‍क्‍यू सेवेसाठी जीसॅट 17 ची मदत होणार आहे. दरम्यान, नियोजित वेळाच्या काही मिनिटं उशिरानं हे उपग्रह आकाशात झेपावले. भारतीय वेळेनुसार बुधवारी उशीरा रात्री 2.29 वाजण्याच्या सुमारास उपग्रह उड्डाण भरावयास हवे होते. जीसॅट 17 यशस्वीरित्या आकाशात झेपावल्यानंतर यासंबंधी माहिती देणारे ट्विटही एरियन स्पेसचे सीईओ स्टीफन इस्राइल यांनी केले. दरम्यान या महिन्यात इस्त्रोद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेले हे तिसरे उपग्रह आहे.