शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कैलास यात्रेमध्ये चीनचा अडथळा

By admin | Updated: June 25, 2017 00:54 IST

भारताने नाथु ला खिंडमार्गे कैलास मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरूंची यात्रा थांबविली असून, सर्व यात्रेकरूंना दिल्लीला परत आणण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताने नाथु ला खिंडमार्गे कैलास मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरूंची यात्रा थांबविली असून, सर्व यात्रेकरूंना दिल्लीला परत आणण्यात येत आहे. चीनच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे यात्रा समितीने सांगितले. नाथु ला खिंडमार्गे कैलास मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी चीनने दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे यात्रेकरूंना सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे नेण्यात आले. आता त्यांना दिल्लीला परत आणण्यात येत आहे. यात्रा अर्ध्यावर सोडावी लागल्यामुळे यात्रेकरूंत प्रचंड नाराजी पसरली आहे. भाविकांना आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्यास मज्जाव करण्यात आल्यानंतर भारताने हा मुद्दा चीनकडे उपस्थित केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नाथु ला खिंडमार्गे होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. भाविक उत्तरांखडमार्गे यात्रा करू शकतात; परंतु हा मार्ग दुर्गम आहे, असे सूत्रांनी सांगितले. चीनने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्यास मज्जाव केल्यामुळे ४७ यात्रेकरूंचा पहिला जथ्था २० जूनपासून भारतीय सीमेवर अडकून पडला होता. हा जथ्था शुक्रवारी सायंकाळी गंगटोक येथे परतला. आम्हाला नाथु लापासून सात कि.मी.वरील शेरतांग येथे एका छावणीत ठेवण्यात आले होते, असे या भाविकांनी सांगितले. दरवर्षी देशभरातून शेकडो यात्रेकरू कैलास मानसरोवर यात्रा करतात. याच महिन्याच्या प्रारंभी शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेदरम्यान चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा करून परस्पर सहकार्य वाढविण्यावर जोर दिला होता. तथापि, चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर आणि एनएसजीतील भारताच्या सदस्यत्वावरून दोन्ही देशांत मतभेद निर्माण झाले असताना चीनचा हा पवित्रा समोर आला आहे.