शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा सामना करण्यासाठी चीनने तैनात केले नवे रणगाडे

By admin | Updated: June 29, 2017 18:21 IST

भारताचा सामना करण्यासाठी चीनने तिबेटमध्ये 35 टन वजनाचे नवीन रणगाडे तैनात केले आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 29 - भारताचा सामना करण्यासाठी चीनने तिबेटमध्ये 35 टन वजनाचे नवीन रणगाडे तैनात केले आहेत. पिपल्स लिबरेशन आर्मीने तिबेटमध्ये या रणगाडयाच्या चाचण्या घेतल्या. चाचण्या आणि रणगाडयाची तैनाती कुठल्या एका देशाला लक्ष्य करण्याच्या इराद्याने केलेली नाही असे चीनी लष्कराचे प्रवक्ते वु कीयान यांनी सांगितले. भारताला लागून असलेल्या तिबेटच्या सीमावर्ती भागात हे रणगाडे तैनात केले आहेत. 
 
भारतीय सैन्याला डोळयासमोर ठेऊन चीन तिबेटमध्ये लष्करी सामर्थ्य वाढवत असल्याचे गुआचा वेबसाईटच्या वृत्तात म्हटले होते. भारताने रशियन बनावटीचे जे T-90 रणगाडे तैनात केलेत त्यापेक्षा चीनच्या नवे रणगाडे तंत्रज्ञान आणि मारकक्षमतेमध्ये उजवे आहेत असे वेबसाईटने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते. डोंगराळ भागातील युद्धाच्या तयारीने हे रणगाडे बनवण्यात आले आहेत. 
 
आणखी वाचा 
 
भारताने मागच्यावर्षी लडाख आणि चीनला लागून असलेल्या सीमावर्ती भागात 100 पेक्षा जास्त T-72 रणगाडे तैनात केले. सिक्कीमध्ये चीनी सैन्याच्या घुसखोरीमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनने या भागातील भारतीय बंकर बुलडोझरच्या सहाय्याने उध्वस्त केले. 
 
दरम्यान भारतीय हद्दीत घुसखोरी करणा-या चीनने उलट भारतावरच नियम मोडल्याचा आरोप केला आहे. सिक्कीमच्या डोकाला भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घुसखोरी करुन भारतीय जवानांना धक्काबुक्की केल्याने दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. भारत नियमबाहय कामे करत असून त्यांना नियम शिकवण्याची गरज असल्याचे ग्लोबल टाइम्स या चीन सरकारच्या वर्तमानपत्राने म्हटले आहे.  
 
भारताला अमेरिका आणि अन्य पाश्चात्य देश पाठिंबा देत असल्याने आपण सैनिकी दृष्टया वरचढ असल्याची भारताची भावना असून त्यामुळे भारत उद्दामपणा करतोय असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले आहे. भारताचा जीडीपी जगात पाचव्या क्रमांकावर असल्याने देश म्हणून भारताचा आत्मविश्वास सध्या भलताच उंचावला आहे. पण भारत अजून चीनपेक्षा भरपूर मागे आहे हे भारताने लक्षात घ्यावे असे ग्लोबल टाइम्समध्ये म्हटले आहे.  सीमावादाला भारताकडून चिथावणी मिळते तरीही, चीन शांतता आणि संयम राखून असल्याचे लेखात म्हटले आहे.