शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

ब्रह्मपुत्रचा प्रवाह चीनने अडवला

By admin | Updated: October 2, 2016 00:50 IST

चीनने तिबेटमध्ये सर्वांत महागडा जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी ब्रह्मपुत्र नदीच्या एका मोठ्या उपनदीचा प्रवाह अडविला आहे. याचा फटका ईशान्य भारताला बसण्याची भीती

बीजिंग : चीनने तिबेटमध्ये सर्वांत महागडा जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी ब्रह्मपुत्र नदीच्या एका मोठ्या उपनदीचा प्रवाह अडविला आहे. याचा फटका ईशान्य भारताला बसण्याची भीती आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणीवाटप करार रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या असतानाच हे वृत्त आले आहे.तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रला यारलुंग झांगबो असे म्हटले जाते. तिच्या झियाबुकू नावाच्या उपनदीवर चीन ७४0 दशलक्ष डॉलर खर्च करून मोठा जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. तिबेटच्या झिगाझे प्रांतात हा प्रकल्प लाल्हो नावाने उभारला जात आहे. हा भाग सिक्कीमला लागून आहे. झिगाझेमधूनच ब्रह्मपुत्र अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते. या प्रकल्पाचे बांधकाम जून २0१४ मध्येच सुरू झाले. २0१९ मध्ये ते पूर्णत्वास जाईल. या प्रकल्पासाठी पाणी अडविल्यानंतर भारत आणि बांगलादेशमध्ये काय परिणाम होईल, याचा आताच अंदाज बांधणे कठीण आहे. गेल्या वर्षी चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रवरच १.५ अब्ज डॉलर खर्चाचा झाम जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित केला होता. त्यामुळे भारताच्या चिंता आधीच वाढलेल्या आहेत. तथापि, चीनने यासंबंधीची भीती आधीच दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रकल्प पाणी कायम स्वरूपी साठवून ठेवणारे नसल्यामुळे कोणालाही चिंता करण्याचे कारण नाही, असे चीनने म्हटले आहे. चीनने तिबेट ताब्यात पूर्ण ताब्यात घेतलेला असून, त्याला स्वायत्त प्रदेश असे नाव दिले आहे. चीनच्या प्रकल्पांविषयी भारताने आधीच चिंता व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)परिणाम आता वर्तवणे अवघडपाणी अडविल्यानंतर भारत आणि बांगलादेशमध्ये काय परिणाम होईल, याचा आताच अंदाज बांधणे कठीण आहे. गेल्या वर्षी चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रवरच झाम जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित केला होता.