शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारतापेक्षा चीन जर्मनीसाठी जास्त महत्वाचा देश

By admin | Updated: June 1, 2017 10:26 IST

भारताने योग्यवेळी जर्मनीबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी पावले उचलली असली तरी, जर्मनीच्या दृष्टीकोनातून अजूनही भारतापेक्षा चीन जास्त महत्वाचा आहे.

 ऑनलाइन लोकमत 

बर्लिन, दि. 1 - युरोपमध्ये भारतासाठी जर्मनी जवळचा सहकारी देश असला तरी, जर्मनीसाठी मात्र भारतापेक्षा चीन जास्त महत्वाचा आहे. जर्मनीचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पेनसाठी रवान होताच चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांची भेट घेतली. चीन आमच्यासाठी आर्थिक आणि व्यापारी दुष्टीकोनातून महत्वपूर्ण देश आहे असे जर्मनीच्या अधिका-यांनी सांगितले. युरोपच्या बाहेर चीन जर्मनीचा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. पण अर्थव्यवस्थेच्या पलीकडे चीनची व्यापारी धोरणे आणि ओबीओआर प्रकल्पाच्या विस्ताराबद्दल जर्मनी सावध आहे. 
 
भारताने योग्यवेळी जर्मनीबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी पावले उचलली असली तरी, जर्मनीच्या दृष्टीकोनातून अजूनही भारतापेक्षा चीन जास्त महत्वाचा आहे. चीनी पंतप्रधानांच्या दौ-याला जर्मन मीडियामध्ये जितकी प्रसिद्धी मिळाली त्या तुलनेत मोदींच्या दौ-याला तेवढे कव्हरेज मिळाले नाही असे निरीक्षकांनी सांगितले. जर्मनीनेही भारताबरोबरचे संबंध बळकट करण्याकडे लक्ष दिले आहे. पण यापेक्षाही जर्मनीने जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने वेगळा आशिया-पॅसिफिक विभाग सुरु केला आहे. भारत आणि चीन या दोन देशांबरोबरच्या संबंध दृढ करण्यावर या विभागाचा भर असेल असे जाणकरांनी सांगितले. 
 
आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर भारत-जर्मनी किंवा भारत-युरोप संबंधाचे भवितव्य अवलंबून असेल. अमेरिकेबरोबर दुरावा वाढल्यानंतर जर्मनीच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसत आहे. आपण दुस-यांवर पूर्णपणे अवलंबून रहायचो तो काळ आत मागे पडलाय. मागच्या काही दिवसांपासून मी हाच अनुभव घेतेय असे मर्केल रविवारी एका निवडणूक प्रचारसभेत बोलताना म्हणाल्या. मर्केल यांनी अप्रत्यक्षपणे इंग्लंड आणि अमेरिकेवर टीका केली होती. 
 
चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीतून आशियाई देशांबरोबरचे संबंध अधिक भक्कम करण्यावर भर दिल्याचे संकेत जर्मनीने दिले होते.  2016 मध्ये भारत आणि जर्मनीमध्ये 17.42 अब्ज डॉलरचा व्यवहार झाला. या दौ-यात जर्मनीमधल्या छोटया आणि मध्यम उद्योग कंपन्यांना भारताच्या मेक इन इंडिया प्रोजेक्टमध्ये जोडण्याचा मोदींनी प्रयत्न केला. आर्थिक संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत. मी या भागीदारीसाठी खूप आशावादी आहे असे मोदींनी सांगितले.