शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चीनसुद्धा 1962 चा राहिलेला नाही, भारताला प्रत्युत्तर

By admin | Updated: July 3, 2017 22:04 IST

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी अरूण जेटलींच्या विधानाला प्रत्युत्तर...

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 3 - भारत आणि चीनचे सैन्य सिक्कीम आणि भूटानमध्ये आमनेसामने आल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही देशांमध्ये एकमेकांविरोधात विधानं करण्याचं सत्र सुरू झालं आहे.  ‘भारताने 1962 मधील पराभव विसरु नये,’ असा इशारा काही दिवसांपूर्वी चीनकडून देण्यात आला होता. चीनच्या या विधानाला ‘भारत आता 1962 सारखा राहिलेला नाही,’ असे म्हणत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले होते. जेटलींना प्रत्युत्तर देताना चीनसुद्धा 1962 चा राहिलेला नाही असं चीनने म्हटलं आहे. 
 
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी सोमवारी जेटलींच्या विधानाला प्रत्युत्तर देताना चीनमध्येही खूप बदल झाला आहे, 1962 चा चीन आता राहिलेला नाही अशा शब्दांमध्ये धमकी दिली आहे.  तसेच पेईचिंग आपल्या सार्वभौमत्वासाठी आणि संरक्षणासाठी कोणतेही पाऊल उचलू शकतो, अशी धमकी शुआंग यांनी दिली.
 
काय म्हणाले होते जेटली-
"जर ते आम्हाला 1962 ची आठवण करून देण्याचा प्रयत्न करत असतील तर 1962 ची परिस्थिती वेगळी होती आणि 2017 चा भारत वेगळा आहे"".
शुआंग यांचं जेटलींना प्रत्युत्तर-
""2017 चा भारत हा 1962 पेक्षा वेगळा आहे, हे ते अगदी बरोबरच बोलत आहेत, पण त्याचप्रमाणे चीनपण खूप बदलला आहे.  असं म्हणत त्यांनी एकाप्रकारे भारताला पुन्हा धमकावलं आहे""
 
स्वभूमीच्या रक्षणासाठी युद्धाचीही तयारी, चीनने धमकावलं-
यापूर्वी भारत आणि चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या वृत्तपत्राने भारताला इशारा दिला आहे. आपल्या भूभागाच्या रक्षणासाठी वेळ पडली तर भारताशी युद्धही करेल, असा इशारा ग्लोबल टाइम्समध्ये छापून आलेल्या लेखामधून देण्यात आला आहे. चीनमध्ये मीडिया सरकारी आहे आणि अशा विधानांना थेट सरकारच्या धोरणाशी जोडून पाहिलं जातं. ‘चीन स्वतःच्या संरक्षणासाठी आणि सार्वभौमत्वासाठी आणि निकराने लढा देईल. यासाठी वेळ पडली तर भारतीय सैन्याविरुद्ध युद्ध करावे लागले, तरीही चालेल, प्रसंगी युद्ध करुन चीन आपल्या भूमीचे संरक्षण करेल, आम्ही तयार आहो’ असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.