शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या श्रृतीची ब्लड कॅन्सरशी झुंज

By admin | Updated: September 10, 2015 16:46 IST

फोटो-स्कॅन

फोटो-स्कॅन
परिस्थितीमुळे उपचारात अडचण : हवाय मदतीचा हात
नागपूर : जीवन म्हणजे काय हे कळण्याइतपतही तिचे वय नाही. खेळणे, बागडणे, स्वप्न बघणे, हट्ट करणारे तिचे वय. या वयात तिला ब्लड कॅन्सरसारख्या भयंकर आजाराने विळखा घातला. नेमके आपल्याला काय झालेय हेही तिला सांगता येत नाही. मात्र तिच्या आजाराची पुष्टी झाल्यापासून आई-वडिलांच्या डोळ्यातून अश्रू थांबता थांबत नाही. ती निरासग आईच्या डोळ्यातील अश्रू बघून, अस्वस्थ होत आहे. आजाराची तिला कल्पना नाही. मला दवाखान्यात कशाला ठेवले आहे, मला घरी जायचे आहे, असा हट्ट तिचा सतत सुरू आहे. तिकडे आई-वडिलांची तिच्या उपचारासाठी धडपड सुरू आहे. मात्र परिस्थितीअभावी तेही हतबल ठरत आहे.
या चिमुकलीचे नाव श्रृती प्रेम बागडे आहे. श्रृती परांजपे शाळेत चवथ्या वर्गात शिकते. श्रृतीचे वडील हातमजुरी करतात. आई चार घरी काम करून, कुटुंबाला हातभार लावते. कालपर्यंत श्रृती सामान्य मुलींसारखीच होती. खोडकर, हसरी, आईवडिलांकडे हट्ट धरणारी, अभ्यासतही ती हुशार. त्यामुळे आईवडिलांबरोबरच, शिक्षक आणि शेजारच्यांचीही ती लाडकी. आठवड्याभरापूर्वी श्रृतीला ताप आला. ताप काही कमी होत नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी रक्ताची तपासणी करण्यास सांगितले. यात तिला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. यावर आई-वडिलांचा विश्वासच बसत नव्हता, त्यामुळे पुन्हा त्यांनी रक्ताची तपासणी केली. त्यातही कर्करोगच निष्पन्न झाला. आणि तिच्या आई-वडिलांना जबर धक्काच बसला. काही हितचिंतकांच्या मदतीने तिच्यावर डॉ. अविनाश पोफळी यांच्या रुग्णालयात पुढच्या उपचाराच्या तपासण्या सुरू झाल्या. डॉक्टरांनी तिच्या उपचारावर तीन लाख रुपये खर्च येईल असे सांगितल्यावर ते अस्वस्थ झाले. मात्र पोरीला जगवायचे आहे, यासाठी पैशाची जुळवाजुळव करू लागले. एवढी मोठी रक्कम उभारणे त्यांना अवघड जात आहे. अनेकांकडे त्यांनी मदतीसाठी हात पुढे केले आहे. अद्यापतरी निराशाच आली आहे.
:::चौकट:::
श्रृतीला जगविण्यासाठी हवेय आर्थिक बळ
या चिमुकलीला जगविण्यासाठी, तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तिला झालेल्या आजाराबद्दल हळहळ व्यक्त करण्यापेक्षा, मदतीचा हात दिल्यास, या चिमुकलीला जगविण्याचे समाधान आपल्याला मिळले. तिला मदत करायची इच्छा असणाऱ्यांनी बँक ऑफ इंडियाच्या शंकरनगर शाखेत ८७०२१०४१०००००११ या क्रमांकाच्या खात्यात मदत करू शकता. अथवा ९६५७७९००५३ या मोबाईल क्रमांकावरही संपर्क साधू शकता.