शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांवरील मुले उघडू शकतात बॅकेत खाते

By admin | Updated: May 7, 2014 12:29 IST

रिझर्व्ह बॅकेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार दहा वर्षांवरील मुले आता कोणत्याही बॅकेत बचत खाते उघडू शकतात.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ७ - वयाची दहा वर्षे पूर्ण केलेल्या मुलांना आता बॅकेत बचत खाते उघडण्यासाठी व ते ऑपरेट करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. रिझर्व्ह बॅकेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार दहा वर्षांवरील मुले आता कोणत्याही बॅकेत बचत खाते उघडू शकतात तसेच त्याचे व्यवहारही करू शकतात. त्याचसोबत त्यांना इंटरनेट बॅकिंग, एटीएम व चेकबुकचे व्यवहार या सुविधांचा वापर करण्याचा अधिकार मिळाला आहे.
यापूर्वी अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांमार्फत मुदत ठेव आणि बचत खाते उघडायची मुभा रिझर्व्ह बँकेने दिली होती. त्यात आता सुधारणा करण्यात आली असून, अल्पवयीन मुले आता आपल्या नैसर्गिक पालकांच्या किंवा कायदेशीर नियुक्त पालकाच्या मार्फत बचत खाते, मुदत ठेव आणि पुनरावर्ती ठेव खाती उघडू शकतात. मात्र यातील जोखीम लक्षात घेता अल्पवयीन मुलांच्या वयाचीव खात्यातील रकमेची मर्यादा ठरवण्याचे अधिकार बँकांना असतील, अशी पुस्तीही  रिझर्व्ह बॅंकेने जोडली आहे. तसेच इंटरनेट बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड, चेकबुक यांसारख्या सुविधा देतानाही त्यावर बँकांची बारीक नजर राहणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.