शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 06:13 IST

पुणे-दिल्लीतील १३ बालकांची सुटका

हैदराबाद : बालकांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा तेलंगणाच्या रचकोंडा पोलिसांनी मंगळवारी पर्दाफाश केला. या प्रकरणी ११ जणांना अटक केली असून त्यात ८ महिला आहेत. त्यांनी पुणे व दिल्ली येथील व्यक्तींकडून ही बालके विकत घेतली होती. त्यांच्या ताब्यातील १३ बालकांची पोलिसांनी मुक्तता केली असून या बालकांमध्ये चार मुलगे व नऊ मुली आहेत.

या प्रकरणी मन्याम साई कुमार यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गेल्या २२ मेपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पुणे व दिल्लीतील ज्या माता-पित्यांना आपले बालक नको होते, त्यांच्याकडून या टोळीतील महिलांनी बालकांना विकत घेतले होते. त्यासाठी त्यांनी प्रत्येक बालकामागे ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत किंमत मोजली होती. या प्रकरणी शोभाराणी, स्वप्ना, शेख सलीम अशांसह ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

महिला डॉक्टरकडून बालकाची विक्री

पोलिसांनी मुक्त केलेल्या बालकांचे वय दोन महिने ते दोन वर्षांपर्यंत आहे. २२ मे रोजी शोभाराणी या महिला डॉक्टरने एक बालक साडेचार लाख रुपयांना विकले. त्या प्रकरणी तिला अटक केल्यानंतर बालकांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांना सुगावा लागला.

एक ते साडेपाच लाख रुपयांना विकले बालकांना

  • आंध्र प्रदेश व तेलंगणातील ज्या दाम्पत्यांना अपत्य हवे होते, अशा लोकांना या टोळीने आतापर्यंत सुमारे ५० बालके विकली असावीत, असा पोलिसांचा कयास आहे. या टोळीकडून अधिक माहिती मिळवून रचकोंडा पोलिस या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढणार आहेत.
  • अपत्याची आस असलेल्या दाम्पत्यांना ही बालके प्रत्येकी १ लाख ८० हजार ते ५ लाख ५० हजार रुपयांची किंमत आकारून विकण्यात आल्याची धक्कादायक माहिती आतापर्यंतच्या तपासात उघड झाली आहे. या प्रकरणातील काही आरोपी फरार असूनही त्यांचाही पोलिस शोध घेत आहेत.

 

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरणHuman Traffickingमानवी तस्करीArrestअटक